बाल शिवाजी शाळेत स्व. अण्णासाहेब देव यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आंतरशालेय वादविवाद स्पर्धेचे यशस्वी आयोजन 

‘ फक्त लेखी परीक्षाचं  मुलांच्या बुद्धिमत्तेचे किंवा सर्वांगिण विकासाचे मूल्यमापन करू शकतात ‘  या विषयावर  बाल शिवाजी शाळेत शाळेचे  संस्थापक स्व. अण्णासाहेब देव यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आंतरशालेय वादविवाद स्पर्धेचे आयोजन  करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा व स्वतःचे मत निर्भिडपणे व्यक्त करता यावे या हेतूने  स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. स्पर्धेचे हे १४ वे वर्ष आहे. 
सर्वप्रथम शाळेचे संस्थापक स्व. अण्णासाहेब देव यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शहरातील १३ शाळेतील २६ विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी विषयांच्या बाजूने व विषयाच्या विरुद्ध बाजूने आपली मते उत्कृष्टरित्या मांडली. या स्पर्धेत बाल शिवाजी माध्यमिक शाळेची  कांचन राजेश कवडे, अदिती ज्ञानेश्वर तराळे  यांची  चमू प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली. या चमूला रोख पारितोषिक तसेच शाळेला स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.प्रभात किड्स शाळेच्या कृष्णाई सतिश देशमुख व देहुती प्रमोद बगळे  या चमूने  व्दितीय क्रमांक पटकावला. तसेच भारत विद्यालयातील संस्कृती रमेश कोठाळे व वैष्णवी संजय पाकदुने  या चमूने उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केले. या स्पर्धेत जिजाऊ कन्या विद्यालयाची सताक्षी सुरेश दांडेकर (विषयाच्या बाजूने) व खंडेलवाल ज्ञान मंदिर ची निधी रामेश्वर टाले ( विषयाच्या विरुद्ध बाजूने) ही उत्कृष्ट वक्ता ठरली. स्पर्धेतील  सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना  रोख पारितोषिके व प्रमाणपत्र देण्यात आले. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.  या स्पर्धेचे परीक्षण सुप्रसिद्ध लेखिका व उद्घोषिका  मा. सौ. सीमा शेटे-रोठे  व डॉ. राधा पुरी  यांनी केले.  तसेच शालेय स्तरावर घेण्यात आलेल्या वादविवाद स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना पुस्तक भेट देऊन त्यांचे याप्रसंगी कौतुक करण्यात आले. ‘वादविवाद स्पर्धेत प्रतिस्पर्ध्याच्या  मुद्दयांचे प्रभावी खंडन करणे जास्त महत्त्वाचे असते ‘ असे विचार मा. सौ. सीमा शेटे-रोठे यांनी याप्रसंगी व्यक्त केले आणि सर्व सहभागी विद्यार्थांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.  कार्यक्रमाचे संचालन सौ. अंजली महाजन  यांनी केले. कार्यक्रमाची सांगता एकात्मता मंत्राने करण्यात आली.   

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.अविनाश देव, संस्थेचे सचिव श्री.विश्वनाथ गद्रे, बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.संगीता जळमकर, बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.कीर्ती चोपडे व शाळेतील सर्व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.