बाल शिवाजी माध्यमिक शाळेत संस्कृत दिन तथा रक्षाबंधन उत्साहात संपन्न

‘आत्मविकासासाठी संस्कृत चा प्रसार करूया आणि ‘मम गृहं संस्कृत गृहं’ या उक्तिनुसार आपल्या दैनंदिन बोलण्यात संस्कृत चा उपयोग करूया ‘…  

मा. सौ. जयश्री देशमुख

ब्राह्मण सभा अंतर्गत बाल शिवाजी माध्यमिक शाळेत संस्कृत दिन तथा रक्षाबंधन उत्साहाने संपन्न झाला.  या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून संस्कृत भारतीच्या नगर मंत्री मा. सौ. जयश्री देशमुख लाभल्या होत्या.  भाषा जननी गीर्वाण भारती असलेल्या संस्कृत भाषेची श्रेष्ठता दर्शविणारा कार्यक्रम याप्रसंगी सादर करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन  करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. अपर्णा बोरखडे यांनी केले. संस्कृत दिनाच्या निमित्ताने पाठांतर स्पर्धा व स्मरणशक्ती स्पर्धा घेण्यात आली.

यामध्ये वर्ग १ ली व २ री  ‘अ’ गट,  इयत्ता ३ री व ४ थी ‘ब’ गट व ५ वी, ६ वी, ७ वी ‘क’ गट होता.  ‘अ’ गटासाठी व ‘ब’ गटासाठी पाठांतर स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये ‘अ’ गटातून प्रथम क्रमांक भार्गवी कुळकर्णी, द्वितीय क्रमांक समर्थ ढोरे, अभिश्री खपली, ‘ब’ गटातून प्रथम क्रमांक वरदा कुळकर्णी, द्वितीय क्रमांक भार्गव देशमुख  ‘क’ गटासाठी स्मरणशक्ती स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये वर्ग ५ वी तून नारायणी कडूस्कार, वर्ग ६ वी राजस्वी शेगोकार, वर्ग ७ वी सोनाक्षी दावेदार हे विद्यार्थी यशस्वी झाले. वर्ग ८ वी च्या विद्यार्थ्यांनी संस्कृत भाषा प्रसाराचा नवसंकल्प आपल्या समूहगीतातून मांडला. रक्षाबंधनाचे महत्त्व वेदश्री जोशी हिने आपल्या भाषणातून सांगितले तर कवी कुलगुरू कालिदासांविषयी माहिती पूर्वेश गावंडे यांने दिली. भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शिवम देशमुख यांने स्वातंत्र्यवीर सावरकर आणि गिरीश निकम याने लोकमान्य टिळक यांची व्यक्तिरेखा साकारली तर जर्मन संस्कृत विद्वान मॅक्स म्युलर यांची भूमिका अबीर गंगाखेडकर याने साकारली. या विषयीचे निवेदन वेदांती कुलकर्णी आणि आत्मजा राऊत हिने केले.  प्रमुख अतिथी सौ जयश्री देशमुख यांनी मार्गदर्शन करताना  ‘आत्मविकासासाठी संस्कृत चा प्रसार करूया आणि मम गृहं संस्कृत गृहं या उक्तिनुसार आपल्या दैनंदिन बोलण्यात संस्कृत चा उपयोग करूया ‘  असा मोलाचा संदेश दिला. अतिथींचा परिचय सौ. स्वाती बापट यांनी करून दिला तर आभार प्रदर्शन सौ. रश्मी जोशी यांनी केले.  कार्यक्रमाचे संचालन वर्ग ८ वीची विद्यार्थिनी श्रेया मसने हिने  केले. संपूर्ण कार्यक्रम संस्कृत भाषेत सादर करण्यात आला. 

 या कार्यक्रमास संस्थेचे सचिव श्री.विश्वनाथ गद्रे, ब्राह्मण सभा कार्यकारिणी सदस्य, सर्व शाळा समिती सदस्य, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर, प्राथामिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.कीर्ती चोपडे व शाळेतील सर्व शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपास्थित होते.