गणित प्रज्ञाशोध परीक्षेत बाल शिवाजी शाळेचे यश 

महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळातर्फे दरवर्षी विविध परीक्षा घेण्यात येतात. त्यामध्ये गणित संबोध परीक्षा, गणित प्राविण्य परीक्षा आणि  गणित प्रज्ञा शोध  परीक्षा घेण्यात येतात.  या परीक्षांमध्ये उत्तम यश प्राप्त करून बाल शिवाजी शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे.  गणित प्रज्ञाशोध परीक्षेत शाळेतील वर्ग 5 ची राजश्री नारायण शेगोकार,  वर्ग 6 चा आयुष गजानन जळमकर, वर्ग ८ ची संस्कृती विनायक पाठक तसेच वर्ग 9 चा कृष्णा अविनाश बोर्डे या विद्यार्थ्यांनी  गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केलेले आहे.  वर्ग 6 च्या  आयुषगजानन जळमकरव वर्ग 8 संस्कृती विनायक पाठक या दोन्ही विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती व पदक प्राप्त केलेले आहे.  तसेच वर्ग ५ ची राजश्री नारायण शेगोकार, वर्ग 9 वा कृष्णा अविनाश बोर्डे या दोन विद्यार्थ्यांनी प्रमाणपत्र प्राप्त केले आहे.  

शाळेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव, सचिव श्री. मोहन गद्रे व कार्यकारिणी सदस्य सौ. अनघाताई देव तसेच बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्ती चोपडे, बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर, सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी  विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.