बाल शिवाजी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा अंतर्गत राज्य स्तरावर घवघवीत यश
बाल शिवाजी प्राथमिक शाळेतील विद्यार्थी दरवर्षी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होतात. यंदाही महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा, जळगांव तर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. अनेक विद्यार्थी या परीक्षेत सहभागी झाले होते . त्यामध्ये इयत्ता २ री चा तन्मय सचिन ताडे आणि गार्गी पराग देशमुख यांनी राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त करून रोख बक्षीस ३०००/- रुपये तसेच प्रमाणपत्र मिळवले आहे.वर्ग ३ चा श्रीयश विनायक पाठक याने देखील राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त करून रोख ३०००/- रुपयाचे बक्षीस प्राप्त केले आहे. तसेच वर्ग ४ चा अधिराज मंगेश मुरूमकर याने राज्यस्तरावर तृतीय क्रमांक प्राप्त करून रोख बक्षीस व प्रशस्तीपत्र मिळवले आहे तसेच ७ वी ची समृद्धी हरिश्चंद्र काळंके ही देखील द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली आहे व रोख ३०००/- रुपयाचे बक्षीस व प्रमाणपत्र प्राप्त केले आहे.
शाळेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव, सचिव श्री. मोहन गद्रे व कार्यकारणी सदस्य सौ. अनघाताई देव तसेच बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्ती चोपडे, बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर, सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले आहे.