सकारात्मक दृष्टीकोन बाळगून देशाची प्रगती करा!
सकारात्मक दृष्टीकोन बाळगून देशाची प्रगती साधण्याचा निश्चय करून स्थानिक बालशिवाजी शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा. देव सर यांनी ध्वजारोहण केले,या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शोभा अग्रवाल,सौ कीर्ती चोपडे उपस्थित होत्या.
राष्ट्र ध्वजाला सर्व उपस्थितांनी सलामी देऊन कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व समूहगीताने झाली . सर्वप्रथम शाळेच्या अध्यापिका सौ. मेधा क्षीरसागर यांनी प्रास्ताविक केले.प्रजासत्ताक दिना विषयी श्रुती गोरे हिने माहिती दिली.
भारतीय राज्य घटनेतील स्त्रियांच्या सहभागा विषयी माहिती देवयानी शिंगणापूरकर हिने आपल्या भाषणातून दिली. शौर्या बद्द्ल दिल्या जाणाऱ्या परमवीर चक्राची निर्मिती कशी झाली व कोणी केली या विषयी अनुष्का टोपले हिने सांगितले. प्रथम परमवीर चक्र प्राप्त सोमनाथ शर्मा यांची शौर्यगाथा आपल्या भाषणातून रोहन मसने याने मांडली. वेगवेगळ्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या महनीय व्यक्तींना सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात येतो या विषयीची माहिती रमण थत्ते याने सांगितली.
आपल्या स्वरचित कवितेतून प्राजक्ता बिनीवाले हिने राष्ट्र ध्वजाला वंदन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. अविनाश देव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मला भविष्यात काय करायचे या साठी आज मला काय करावे लागेल याचा विचार आजच्या दिवशी करा म्हणजे तुमच्या आयुष्यात तेजस्वी पहाट निश्चित येईल असा विश्वास विद्यार्थ्यांना दिला.
वंदेमातरम ने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सुत्रसंचालन वैष्णवी सुरडकर हिने केले.या कार्यक्रमाला ब्राह्मण सभा कार्यकारिणी सदस्या सौ अनघा देव,शाळा समिती सदस्य,पालकवर्ग उपस्थित होते.