शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वची प्रेरणा भावी पिढीने घ्यावी –  मा.गायत्री देशमुख   

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्याने बाल शिवाजी शाळेत आयोजित कार्यक्रमात बोलताना ‘ शिवाजी महाराजांचे कर्तृत्व व कार्याची प्रेरणा भावी पिढीने घ्यावी. राष्ट्रहिताचा विचार करून देशकार्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेतसेचइतिहासातील गौरवशाली परंपरा असणाऱ्या गड, किल्ल्यांना विद्यार्थ्यांनी भेट द्यावी व महाराजांचा इतिहास जाणून घ्यावा  ‘ असे मार्गदर्शन मा. गायत्री देशमुख यांनी याप्रसंगी केले.      

स्थानिक जठारपेठ अकोला येथे बाल शिवाजी शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शाळेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव व प्रमुख पाहुणे  मा.गायत्री देशमुख या  उपस्थित होत्या. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ‘ शिवाजी महाराजांची पर्यावरण नीती ‘ या विषयी ईश्वरी तायडे व आनंदी गावंडे यांनी माहिती  सांगितली. ‘ The Oath of Swaraj ‘  या विषयी आदित्य आवळे याने इंग्रजीतून माहिती सादर केली. तसेच वीररत्न बाजी पासलकर यांच्या कार्याची महती पयोष्णी देशमुख हिने सांगितली. त्यानंतर  

वर्ग ६ च्या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांनी कोंढाणा किल्ला कसा हस्तगत केला हे पोवाड्याद्वारे सादर केले. शाळेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव यांनी प्रमुख अतिथी मा. गायत्री देशमुख यांना शाळेची आठवण म्हणून भेटवस्तू प्रदान केली. कार्यक्रमाला संस्थेचे सचिव श्री. मोहन गद्रे,  बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर, श्री. महेश कोतेगावकर, शिक्षक वृंद, पालक वर्ग व  सर्व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन वर्ग ६ ची अनुष्का राऊत हिने केले  तर प्रास्ताविक शाळेच्या शिक्षिका सौ. ज्योती कोकाटे  यांनी केले तर  आभार प्रदर्शन सौ. श्रद्धा रेलकर यांनी केले.  कार्यक्रमाची सांगता एकात्मता मंत्राने झाली.