शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा ‘शिक्षकदिन ‘ संपन्न
बाल शिवाजी शाळेत शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यानिमित्याने शालेत स्वयंशासन घेण्यात आले. अध्यापकांची भूमिका विद्यार्थ्यांनी अगदी नियोजनबद्ध व शिस्तीत पार पाडली. वर्ग १० च्या विद्यार्थ्यांनी १ ते ९ च्या वर्गाना अध्यापन केले. त्यानंतर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पद वर्ग १० चा विद्यार्थी प्रज्वल घोगले याने भूषविले. संचलन अनुष्का सोनटक्के हिने केले. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनकार्याचा आढावा वैष्णवी जोशी हिने आपल्या भाषणातून घेतला. आकांक्षा देशमुख हिने आपल्या स्वरचित कवितेतून शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षकांचा सकारात्मक दृष्टीकोन विद्यार्थी जीवनाला कसा वळण देणारा असतो? हे तेजस्वी गावंडे हिने आपल्या इंग्रजी भाषणातून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची माहिती सांगितली. अध्यक्षांचा परिचय यश खुमकर याने दिला. ‘शिक्षकांचे आपल्या जीवनातील स्थान’ या विषयी आपले विचार प्रज्वल घोगले याने व्यक्त केले. संस्थेचे सचिव मा. श्री. गद्रे सर व संस्थेचे उपाध्यक्ष श्री. नरेंद्र पाठक सर यांच्या हस्ते शिक्षिकांना शिक्षकदिनानिमीत्य पुस्तके प्रदान करण्यात आली. या निमित्ताने स्नेहभोजन आयोजित करण्यात आले. ब्राह्मण सभा कार्यकारिणी सदस्य, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.