शाडूच्या मातीपासून गणपती निर्मिती स्पर्धा……
गणेशोत्सवाचे निमित्त साधून दि.२४ ऑगस्ट २०२४ शनिवार रोजी नंद गणपती संग्रहालय, मोथा, चिखलदरा; ब्राह्मण सभा, अकोला. अँड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘शाडूच्या मातीपासून गणपती निर्मिती’ स्पर्धेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. यामध्ये ४०० पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. ‘अ’ गटातून पार्थ सतरकर, स्वरा भालतिलक, ओम शेगोकार ‘ब’ गटातून मयुरेश चिलात्रे, पूजा पवार, आस्था ताडे तर ‘क’ या खुल्या गटातून संजू बरडिया,संजना प्रजापती, भाविका महल्ले, हिमांशू बायस्कर हे अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या,तिसऱ्या व चौथ्या क्रमांकाचे विजयी स्पर्धक ठरले. या प्रसंगी नंद संग्रहालय मोथा, चिखलदरा याच्या प्रमुख, सौ दिपाली नंद, सहप्रमुख सौ. इंद्रायणी देशमुख, बाबासाहेब ढोणे चित्रकला महाविद्यालयाच्या प्राध्यापिका सौ. सुवर्ण नागपुरे, स्पर्धेचे निरीक्षक श्री. शरद कोकाटे, श्री. गजानन बोबडे, अँड.धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्पाचे अध्यक्ष श्री निलेश देव, सचिव श्री. जयंत सरदेशपांडे, ज्येष्ठ रंगकर्मी श्री दिलीप देशपांडे या सर्व मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.