विद्या भारती (विदर्भ) अकोला जिल्हा तर्फे आयोजित देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेत बाल शिवाजी शाळेच्या विदयार्थ्यांनी बाजी मारली

विद्या भारती (विदर्भ) अकोला जिल्हा तर्फे दि. २० ऑगस्ट रविवार रोजी तिरुपती तंत्र निकेतन ,केशव नगर येथे आयोजित देशभक्तीपर गीतगायन स्पर्धेत शहरातील एकूण २१ शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते . ८-१० च्या गटाने प्रथम क्रमांक प्राप्त केला. या गटाने ‘हमे जान से प्यारा …..’ हे गीत सादर केले.

या गटात रसिका गोसावी ,ओजस्वी बोर्डे ,कोमल खरोटे, शर्वरी जोशी,वागेश्वरी गदाधर,धारा देशमुख,मिताली पाकळ,हर्षदा पाटील,संपदा साधू,समृद्धी वऱ्हाडे,श्रुती राऊत ह्या विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. १-४च्या गटाने ‘जयोस्तुते जयोस्तुते .. श्री… ‘ हे गीत सादर करून द्वितीय क्रमांक प्राप्त केला. या गटात कृष्णा सारभुकन ,गार्गी गाडगीळ , निरल निखाडे , सानिका घोगरे , संस्कृती पाठक , अनघा दुतंडे ,अवनी देशपांडे , कात्यायनी कडू , अर्पिता ढोरे ,वैष्णवी लोहित, ऋग्वेद रानडे हे विदयार्थी सहभागी झाले होते .

तर ५ -७ च्या गटाने ‘रक्ताने लिहून गाथा ‘ हे गीत सादर करून तृतीय क्रमांक पटकावला . या गटात वरदा बिडवाई , ऋचा देशपांडे , मानसी डांबरे . मधुरा मल्हार , आदिती खुणे , श्रेयस पाटील ,सोहम राय , प्रणव लोहित , अथर्व पत्की , समर्थ जोशी , आर्या सुहास देशपांडे हे विदयार्थी सहभागी झाले होते.विजेत्या तीनही गटांना स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.हार्मोनियम वर राघवेंद्र करंडे व तबल्यावर श्री. प्रशांत कोरान्ने यांनी संगत केली.

सर्व विद्यार्थ्यांना संगीत शिक्षिका सौ. सरोज जोशी व श्री. प्रशांत कोरान्ने यांनी मार्गदर्शन केले.

संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव,कार्यकारिणी सदस्या सौ. अनघा देव,मुख्याध्यापिका,शिक्षकवृंद यांनी कौतुक केले.