विद्यार्थी विज्ञान मंथन वैज्ञानिक स्पर्धेमध्ये बाल शिवाजी शाळेच्या विद्यार्थ्यांचे सुयश
विज्ञान व तंत्रज्ञान विभाग भारत सरकार यांच्या तर्फे विद्यार्थी विज्ञान मंथन वैज्ञानिक स्पर्धा २०२३-२४ वर्ग ६ व १० साठी घेण्यात येते. ही परीक्षा तीन स्तरावर घेण्यात येते. या स्पर्धेत बाल शिवाजी शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्तम यश संपादन केले आहे.या स्पर्धेच्या प्रात्यक्षिक परीक्षेच्या दुसऱ्या फेरीसाठी वर्ग ६ वी चा अंशुमन धनंजय धोत्रे जिल्ह्यातून १ ला, राज्यातून ४ था, अधिराज मंगेश मुरूमकार जिल्ह्यातून ३ रा, राज्यातून २२ वा, वर्ग ७ वी ची राजस्वी नारायण शेगोकार जिल्ह्यातून १ ली, राज्यातून ३ री, रेवती रमण घोगरे जिल्ह्यातून ७ वी, राज्यातून ११ वी तसेच वर्ग ८ वी आयुष धिरज भिसे जिल्ह्यातून ३ रा ,वर्ग ९ ची समृद्धी हरिश्चंद्र काळंके जिल्ह्यातून १ ली, वर्ग १० वी ची रुजुता रमण घोगरे जिल्ह्यातून १ ली, संस्कृती विनायक पाठक जिल्ह्यातून २ री , मृदुला अविनाश देशमुख जिल्ह्यातून ३ री या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे.
विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री.अविनाश देव, संस्थेचे सचिव श्री. मोहन गद्रे, संस्थेच्या कार्यकारिणी सदस्य अनघाताई देव, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्ती चोपडे, शिक्षक वृंद व कर्मचारी यांनी कौतुक केले आहे. तसेच दुसरी फेरी १७ डिसेंबर २०२३ रोजी अमरावती येथे होणार असून त्याकरिता त्यांना सर्वांनी शुभेच्छा दिल्या आहेत.