वाचन संस्कृतीचा वारसा जपत राज्यस्तरीय वाचन स्पर्धेत बाल शिवाजी शाळेची तनुश्री दाभाडे प्रथम
कै.सिताराम नारायण देशपांडे यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय वाचन स्पर्धेत बाल शिवाजी माध्यमिक शाळेची विद्यार्थिनी तनुश्री केशवराव दाभाडे राज्यातून प्रथम आली आहे. या स्पर्धेसाठी वाचलेल्या पुस्तकाचा आशयाचा व्हिडिओ तयार करून पाठवायचा होता. तनुश्री ने सद्गुरु श्री वामनराव पै लिखित ‘ तूच आहेस तुझा जीवनाचा शिल्पकार’ हे पुस्तक निवडले. मोजक्या शब्दात व सहज शैलीत व्हिडिओच्या माध्यमातून तिने पुस्तकाचा आशय स्पष्ट केला. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा 27 ऑगस्ट रोजी विद्यार्थी सहाय्यक समिती शिवाजीनगर पुणे या ठिकाणी संपन्न झाला. याप्रसंगी प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व भेट म्हणून पुस्तके देऊन तनुश्रीला सन्मानित करण्यात आले.
तिच्या या यशाबद्दल तिचे संस्थेचे अध्यक्ष श्री.अविनाश देव,सचिव श्री.मोहन गद्रे,कार्यकारिणी सदस्य सौ.अनघा देव,शाळा समिती सदस्य, बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्ती चोपडे, बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.संगिता जळमकर, सर्व शिक्षिका,कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले.