राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत बाल शिवाजीचा शाळेच्या विज्ञान प्रकल्पाची विभागीय स्तरावर निवड
स्थानिक जठारपेठ स्थित बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या वर्ग ७ च्या विद्यार्थीनींच्या विज्ञान प्रकल्पाची विभागीय स्तरावर निवडण्यात आली आहे. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे दरवर्षी राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचे आयोजन करण्यात येते. ३० नोव्हेंबरला online पद्धतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय प्रकल्प सादरीकरणात एकूण ३९ प्रकल्पांचा समावेश होता. ३९ पैकी ५ प्रकल्पांची विभागीय स्तरावर निवड करण्यात आली. त्यामध्ये बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या प्रकल्पाची विभागीय स्तरावर निवड करण्यात आलेली आहे . Reuse of waste thermocol for making easy to handle pots, bricks and pillows हा प्रकल्प वेदश्री विशाल बकाल व पयोष्णी प्रसाद देशमुख वर्ग ७ च्या विद्यार्थीनींनी सादर केला. यासाठी त्यांना शिक्षिका सौ. संगीता भारंबे व सौ. श्रद्धा रेलकर यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.अविनाश देव, संस्थेचे सचिव श्री.विश्वनाथ गद्रे,कार्यकारिणी सदस्य सौ. अनघाताई देव,ब्राह्मण सभा कार्यकारिणी सदस्य, सर्व शाळा समिती सदस्य, प्राथामिक शाळेच्या मुख्याध्यापिकासौ.कीर्ती चोपडे, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.संगीता जळमकर व शाळेतील सर्व शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले.