मोठं व्हायचंय मला ! —— विवेकजी घळसासी

बाल शिवाजी माध्यमिक शाळा अकोला येथे श्री. विवेकजी घळसासी यांचे व्याख्यान दि. ३० .१०.१८ रोजी आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव श्री. मोहन गद्रे सर, सहसचिव वैशाली देशपांडे, शाळा समिती सदस्य लोहिया मॅडम, श्री झापे सर, श्री. थोडगे सर, योग शिक्षिका मनीषा नाईक, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शोभा अग्रवाल, सौ.कीर्ती चोपडे,उपमुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर, सौ. भारती कुळकर्णी, शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते. दीपप्रज्वलाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. संस्थेचे सचिव श्री. मोहन गद्रे यांनी श्री. घळसासी यांचे पुष्प देऊन स्वागत केले.
श्री. घळसासी यांनी आपल्या भाषणातून व्यक्तिमत्व घडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी करण्याच्या छोट्या छोट्या गोष्टी, साधे साधे नियम याकडे लक्ष दिले पाहिजे तेव्हाच व्यक्ती मोठी होऊ शकते. त्यांनी आपल्या भाषणात अनुशासनाचे पालन, मनमोकळे पणाने वागणे, मोठ्यांचा मान राखणे,आई वडिलांचे महत्व इ. गोष्टी रूपाने समजावून सांगितले. उत्तम अभ्यास करण्यासाठी अभ्यासाची भीती न बाळगता रोज नियमाने थोड्या थोड्या अभ्यासाची भर घालणे व शालेय संस्कारांची जोपासना करणे तसेच स्वतःसाठी जगतांना इतरांसाठी जगणे शिका असा संदेश विद्यार्थ्यंना दिला.
श्री. गद्रे सर यांनी श्री. घळसासी यांना सस्नेह भेट प्रदान केली. आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता एकात्मता मंत्राने करण्यात आली.