मुलांना चुका करण्याचे स्वातंत्र्य द्या – मा. नरेंद्र लांजेवार

बाल शिवाजी शाळेत पालकांसाठी निबंध स्पर्ध आणि पारितोषिक वितरण समारंभ

मुलांना चुका करण्याचे स्वातंत्र्य द्या. त्यांना केवळ पाठ्यपुस्तकातीलच नव्हे तर दैनंदिन जीवनातील गोष्टी शिकविणे आवश्यक आहे. मुले शिकतांना चुका करतील तरी त्यांना पुन्हा संधी द्या. असे विचार प्रसिद्ध वक्ते, लेखक व पालकत्व या विषयावरील तज्ञ श्री. नरेंद्र लांजेवार ग्रंथपाल , भारत विद्यालय बुलढाणा यांनी या प्रसंगी मांडले. “ आई बाबांशी दोन शब्द .. ” या विषयावर बोलताना त्यांनी पालकांशी सवांद साधला.

बाल शिवाजी शाळेत पालकांसाठी “ पुस्तक परीक्षण “ व “ मी ___ हेच वर्तमानपत्र वाचते / वाचतो कारण ____ ”. या विषयावर लेखन स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेला एकूण ८० पालकांनी आपले मत या निबंधाच्या निमित्तने नोंदवून उत्कृष्ट प्रतिसाद दिला .

या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा नुकताच उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री.नरेन्द्र लांजेवार यांचे आई बाबांसाठी दोन शब्द या विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलनने झाली. शाळेचे अध्यक्ष श्री अविनाश देव , सचिव श्री. मोहन गद्रे, आणि श्री. नरेंद्र लांजेवार तसेच व्यासपीठावर उपस्थित होते.

मान्यवरांचे स्वागत वाचनालयाच्या ग्रंथपाल सौ. धनश्री देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निबंधलेखन उपक्रमाच्या संयोजिका व कार्यकारणी सदस्या सौ. अनघाताई देव यांनी केले. या प्रसंगी प्रा. निलेश पाकदूने यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तसेच स्पर्धेचे परीक्षक डॉ. दीपक दामोदरे आणि प्रा. डॉ. राजेंद्र मेंडकी यांनी परिपूर्ण लेखन कसे असावे या बाबत त्यांचे अभिप्राय मांडले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी नरेंद लांजेवार यांनी सकारात्मक पालकत्व या विषयावर मार्गदर्शन केले.

त्यानंतर “पुस्तक परीक्षण” या विषयासाठी प्रथम पारितोषिक श्री. गजानन कुलकर्णी , द्वितीय श्री. निलेश पाकदुणे आणि उत्तेजनार्थ सौ. वंदना शेकोकार यांना तसेच “मी ….. हेच वर्तमानपत्र वाचतो/वाचते कारण ….” या विषय साठी प्रथम पारितोषिक श्री. प्रदीप किडीले , द्वितीय श्री. गजानन वाकोडे आणि उत्तेजनार्थ श्री. अनंत गद्रे या पालकांना प्रमुख अतिथींच्या हस्ते परितोषिके प्रदान करण्यात आलीत.

कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव, सचिव श्री. मोहन गद्रे, बाल शिवाजी प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या मुख्याधापिका शाळा समिती सदस्य, शिक्षक आणि पालकांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका सौ. समिधा देशमुख यांनी केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.