महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत बाल शिवाजी शाळेचे घवघवीत यश

जठारपेठ परिसरातील ब्राह्मण सभा संकुलांतर्गत असलेले बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या विद्यार्थांनी महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेमध्ये घवघवीत यश प्राप्त केले आहे. नौरोसजी वाडीया महाविद्यालय पुणे तर्फे आयोजित महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत वर्ग आठवीतून आस्था अभय अग्रवाल हिने राज्यातून १८ वे स्थान पटकावले तर प्रज्वल जगन्नाथ घोगले हा जिल्हयातून पहिला आला. तसेच हर्षल अमर गजभिये ,यश उज्वल खुमकर ,शैलजा प्रशांत लोहिया ,रमण उदय थत्ते यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केले. राज चंद्रशेखर उपासने ,अभिनव ज्ञानेश्वर टोहरे ,मानसी अरुण राऊत ,गौरी सुधीर मिसुरकर ,वेदांत मनोज मरावार ,श्रुती अविनाश काळे, चैतन्य शैलेश कुळकर्णी ,अथर्व विनोद घाटोळ यांना उत्तेजनार्थ बक्षिस प्राप्त केले.
वर्ग नववीचे शर्वरी उमेश रेळे,साक्षी गोपाल सोळंके,यशराज प्रमोद तायडे,रुपेश विजय ठाकरे यांनी विशेष प्राविण्य मिळविले तर अथर्व जगदीश पाटील याने उत्तेजनार्थ स्थान प्राप्त केले. वर्ग दहावीचे आरोही रामदास खोडकुंभे जिल्ह्यातून दुसरी ,जयेश गजानन चंदन जिल्ह्यातून तिसरा तर सुरभी अनिल देशपांडे ,मंदार उमेश कुळकर्णी ,अथर्व अजित पाटखेडकर यांनी विशेष प्राविण्य श्रेणी प्राप्त केली तर साक्षी दिलीप पाटकर,इशा नितीन मोहोड,मृण्मयी नरेंद्र काश्यपे यांनी उत्तेजनार्थ बक्षीस मिळविले आहे.
 सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव ,कार्यकारिणी सदस्या सौ. अनघा देव ,मुख्याध्यापिका सौ.शोभा अग्रवाल ,सौ.संगीता जळमकर  सौ.कीर्ती चोपडे,सौ. भारती कुलकर्णी व सर्व शिक्षिकांनी अभिनंदन केले.