भूगोल प्रदर्शनीचे उद्घाटन
शालेय विद्यार्थ्यांना भूगोल विषयाची अधिक माहिती मिळावी या दृष्टीकोनातून जठारपेठ स्थित स्वा.सावरकर सभागृह येथे बुधवार २१. ०२. २०१८ रोजी निसर्ग अभ्यास केंद्र व बाल शिवाजी शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भूगोल प्रदर्शनी २०१८ चे उद्घाटन बाल शिवाजी शाळेचे अध्यक्ष मा. श्री. अविनाश देव यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटन प्रसंगी संस्थेचे सचिव श्री. मोहन गद्रे, निसर्ग शिक्षण कार्यसंस्थेचे प्रमुख मा. श्री. प्रभाकर दोड, श्री. सुनिल सरोदे, अजिंक्य फिटनेस सेंटरचे संचालक श्री. धनंजय भगत, कार्यकारिणी सदस्या सौ. अनघा देव तसेच शाळा समिती सद्यस्य, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कीर्ती चोपडे, सौ, संगीता जळमकर व भूगोल विषयाच्या शिक्षिका उपस्थित होत्या.
३ दिवस चालण्याऱ्या या प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी श्री.दोड सरांनी भूगोल विषयाच्या अध्यापनात प्रतिकृतींचे महत्त्व विशद केले. अक्षवृत्ते, रेखावृत्ते,ग्रहणे, राशी इ. मूळ भौगोलिक संकल्पनाबद्द्ल अगदी सहज भाषेत विदयार्थ्यांना माहिती दिली. बाल शिवाजी शाळा व फुलपाखरू मराठी प्रा. शाळा, भारत विद्यालय, महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय, पवार कला महाविद्यालय, मूर्तिजापूर या विदयार्थ्यांनी प्रदर्शनाला भेट दिली. दि. २२ व २३ तारखेला देखील हे प्रदर्शन भूगोल अभ्यासकांसाठी खुले राहणार आहे .