” भारतीय प्रथा परंपरांना वैज्ञानिक आधार आहे.  ” – मा.डॉ. श्री.हरीष मालपाणी
बाल शिवाजी शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन व मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा 

बाल शिवाजी शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन व मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी व्यासपीठावर मा. डॉ. हरीष  मालपाणी  विभागप्रमुख सूक्ष्मजीवशास्त्र विभाग आर.एल.टी. कॉलेज ऑफ सायन्स अकोला व कुतूहल संस्कार केंद्र अकोला चे संचालक डॉ. नितीन ओक सर, संस्थेचे उपाध्यक्ष श्री. बाबासाहेब पाठक,  प्रा. उमा शिवाल मॅडम  व प्रा. शशीरेखा पारीका मॅडम उपस्थित होते.  डॉ. सी व्ही रमण व कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. मा. डॉ. श्री. हरीष मालपाणी यांचे स्वागत संस्थेचे उपाध्यक्ष श्री. बाबासाहेब पाठक यांनी केले. तर मा. डॉ. नितीन ओक यांचे स्वागत बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर  यांनी केले. प्रा. उमा शिवाल मॅडम  व प्रा. शशीरेखा पारीका मॅडम  यांचे स्वागत बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्ती चोपडे यांनी केले. याप्रसंगी बोलताना मा.डॉ. श्री. हरीष मालपाणी  यांनी ” भारतीय प्रथा परंपरांना वैज्ञानिक आधार आहे, भारताने जगाला विज्ञान दिले असे सांगितले.  विद्यार्थ्यांनी सभोवतालच्या प्रत्येक गोष्टी मध्ये विज्ञान शोधायला हवे ” असे मत त्यांनी मांडले.  मराठी राजभाषा दिनानिमित्त माध्यमिक शाळेच्या शिक्षिका सौ. किर्ती खपली यांनी मराठी साहित्याची ओळख आपल्या प्रास्ताविकातून मांडली. जान्हवी खेंडकर  हिने आपल्या भाषणातून मराठी भाषेची थोरवी कथन केली तर सायली इंगळे हिने स्वरचित कविता सादर केली.  श्रेया पोफळी हिने आपल्या भाषणातून डॉ. सी व्ही रमण यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.  अनुश्री मांडेकर ने ‘ क्रायोजेनिक तंत्रज्ञान ‘ या विषयावर  माहिती सांगितली. ‘ Do it yourself ‘ , ‘ Perform and Analyse ‘  ही आंतर शालेय विज्ञान स्पर्धा २२ फेब्रुवारी २०२२ रोजी वर्ग ८ ते १० साठी आयोजित करण्यात आली होती.  ही स्पर्धा बाल शिवाजी माध्यमिक शाळा  व कुतूहल संस्कार केंद्र यांच्या सक्रिय सहभागाने आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये प्रभात किड्स स्कूलच्या जित झामड, पद्मकांत बोथा, दुर्गा डागा या गटाने प्रथम क्रमांकाचे १०००/ रु. चे रोख पारितोषिक पटकावले तर स्वयम अवचार, सिया अग्रवाल, सोहम श्रीनगर या प्रभात किड्स स्कूलच्या गटाचा व्दितीय क्रमांक आला. तृतीय क्रमांकाचे पारितोषिक ज्युबिली इंग्लिश स्कूलच्या शाश्वत जानोरकर, वेदांत माहोरे, प्रथमेश कुकडे यांनी प्राप्त केले.  विशेष म्हणजे केवळ ज्ञान वृद्धीच्या हेतूने बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या भक्ती मेन, ऋजुता घोगरे व स्वरांजली कडू या विद्यार्थिनींचा गट स्पर्धेत सहभागी झाला होता. या गटाने उत्कृष्ट सादरीकरण केले. त्यासाठी कुतूहल संस्कार केंद्रातर्फे १०००/ रु. चे रोख पारितोषिक देऊन या गटाचे कौतुक करण्यात आले.  सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके प्रशस्तीपत्र प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रदान करण्यात आले. Inter School Science Funfair  ही स्पर्धा वर्ग ५ ते ७ साठी आयोजित करण्यात आली होती.  या स्पर्धेमध्ये वर्ग ५ वी साठी जीवशास्त्र विषयावरील chart presentation तर वर्ग ६ वी साठी भौतिकशास्त्रावर आधारीत Working Model Presentation व वर्ग ७ वी साठी रसायनशास्त्रावर आधारीत प्रयोग सादर करण्यात आले . शहरातील विविध शाळा या  स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेत बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या प्रणव नवले व तनिष बाहेकर तसेच प्रभात किड्सच्या कृष्णाई देशमुख यांनी अनुक्रमे वर्ग ५, ६, ७ मधून प्रथम क्रमांक पटकावला.  प्रभात किड्सच्या शौनक शिंगरूप व वेदांत गडोदिया व बाल शिवाजी प्राथमिक शाळेची समृद्धी काळंके यांनी अनुक्रमे वर्ग ५, ६, ७ मधून द्वितीय क्रमांक प्राप्त केला . कोठारी कॉन्व्हेंटच्या अथर्व बाहेती व  ज्युबिली  इंग्लिश स्कूलच्या सुप्रिया भिमकर व यश अडागळे  हे विद्यार्थी अनुक्रमे वर्ग ५,६,७ मधून  तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत. ज्युबिली इंग्लिश स्कूलचा अलमन खान,  खंडेलवाल इंग्लिश स्कूलचा श्रेयस कराळे, खंडेलवाल ज्ञान मंदिर स्कूलची अक्षदा राठोड स्कूल ऑफ स्कॉलर्स ची आर्या भोजापुरे, कोठारी कॉन्व्हेंट चा चिन्मय ढेपे, गुरुनानक कॉन्व्हेंट ची पूर्वा चांदवानी या विद्यार्थ्यांना  प्रोत्साहनपर बक्षिस मिळाले. या स्पर्धेचे परीक्षण आर.एल.टी. कॉलेज ऑफ सायन्स अकोलाच्या  प्रा. उमा शिवाल व प्रा. शशीरेखा पारीका यांनी केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते बक्षिसे वितरित करण्यात आली. या प्रसंगी  मा. डॉ. नितीन ओक सर व प्रा. उमा शिवाल मॅडम यांनी  विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथीना संस्थेच्या वतीने स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन सौ. अरुणा नावकार यांनी केले.            सर्व यशस्वी विदयार्थ्यांचे  कौतुक संस्थेचे अध्यक्ष अविनाश देव, सचिव मोहन गद्रे, कार्यकारिणी सदस्य सौ. अनघा देव, ब्राह्मण सभा कार्यकारिणी सदस्य, शाळा समिती सदस्य, बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर, बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या  मुख्याध्यापिका सौ. किर्ती चोपडे, सर्व शिक्षिका, कर्मचारी यांनी केले आहे.