बाल शिवाजी शाळेत सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी
स्थानिक जठारपेठ स्थित बाल शिवाजी शाळेत ३ जानेवारी २०२२ सोमवार रोजी ‘बालिका दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून मानवंदना देण्यात आली . वर्ग १ ते ४ च्या विद्यार्थिनींनी भारतीय प्रतिभावान स्त्री व्यक्तिमत्वाच्या वेशभूषा करून त्यांच्या कार्याची महती थोडक्यात सांगितली. तसेच वर्ग ५ ते ९ च्या विद्यार्थ्यांनी वर्गात गटानुसार ‘सावित्रीबाई फुले जयंतीचा ‘ कार्यक्रम सादर केला .
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षा निमित्ताने शिक्षण विभाग पंचायत समिती ,अकोला तर्फे आयोजित तालुका स्तरीय वक्तृत्व स्पर्धेत आपल्या शाळेतील वर्ग ७ ची विद्यार्थिनी कु. प्रणाली अनिल गावंडे हिने व्दितीय क्रमांक पटकावला. इयत्ता ६ वी ते १२ वी च्या गटात ‘सावित्रीबाई फुले एक थोर समाजसुधारक’ या विषयावर तिने आपले विचार मांडले .१२ जानेवारी रोजी होणाऱ्या जिल्हा स्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी तिची निवड झालेली आहे. तिचे संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव ,सचिव श्री. मोहन गद्रे ,कार्यकारिणी सदस्या सौ. अनघा देव, बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर, बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्ती चोपडे, शिक्षिका यांनी कौतुक केले व शुभेच्छा दिल्या .