बाल शिवाजी शाळेत सामूहिक अथर्वशीर्षाचे चतु:सहस्त्रवर्तन !

दिनांक १६/०९/२०२४ रोजी गणेशोत्सवाचे औचित्य साधून ब्राह्मण सभा अंतर्गत बाल शिवाजी शाळेत मनाला प्रसन्न करणाऱ्या अथर्वशीर्षाचे चतु:सहस्त्रवर्तन करण्यात आले.गणपती ही बुद्धी ची देवता आहे .चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असणाऱ्या श्री गणपतीची आराधना करण्यासाठी,बुद्धीला स्थिरता येण्यासाठी योजिलेले उपनिषद म्हणजे अथर्वशीर्ष होय.सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवून आदर्श विद्यार्थी घडावेत यासाठी दर वर्षी शाळेत अथर्वशीर्षाचे सामूहिक पठण केले जाते.  संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.अविनाश देव,संस्थेचे सचिव श्री.मोहन गद्रे , शाळासमिती सदस्या सौ.अनघा देव, शाळासमिती सदस्य श्री. निलेश पाकदुने, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.संगिता  जळमकर , सौ .कीर्ती चोपडे टिचर यांनी श्री. गणपतीचे पूजन केले. उपस्थित मान्यवर, सर्व शिक्षिका, कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी तन्मयतेने अथर्वशीर्षाचे पठण केले.तत्पूर्वी श्री गणपती आणि संगणक यांच्यातील साधर्म्य विशद करून, श्री गणपती ही मॉडर्न युगातील स्मार्ट देवता कशी आहे हे आपल्या प्रास्ताविकातून सौ.साक्षी सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले. यानंतर गणपतीची आरती झाली. ‘गणपती बाप्पा मोरया!!!’या जयघोषाने वातावरण उत्साहित व प्रफुल्लित झाले.