बाल शिवाजी शाळेत शिवजयंती साजरी
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती बाल शिवाजी शाळेत साजरी करण्यात आली. याप्रसंगी स्वराज्याचे शिलेदार असणाऱ्या मावळ्यांना मानाचा मुजरा म्हणून वर्ग ६ च्या विद्यार्थांनी ‘स्वराज्याचे शिलेदार ‘ हा कार्यक्रम सादर केला. त्यावेळी सार्थक सोमण याने कवी भूषण, सोहम खपली याने कोंडाजी फर्जंद, आराध्य जोशी -हिरोजी इंदुलकर, आयुष भिसे – बाजी पासलकर, ओम सोळंके – बहिर्जी नाईक, भार्गव राजूरकर – निष्ठावंत मुस्लीम सरदार , योगीराज भारसाकळे – प्रतापराव गुजर यांचे कार्य सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यातून आपण कोणते धडे घ्यावेत याबद्दल पियुष काळे याने इंग्रजी भाषणातून आपले विचार मांडले.
याप्रसंगी भारतरत्न स्व. लता मंगेशकर यांना आदरांजली, म्हणून स्वा. सावरकर लिखित ‘प्रभो शिवाजी राजा … ‘ हे गीत सादर करण्यात आले. या समूहगीतात ज्ञानदा चापके, आरोही महाशब्दे, वरद कवडे, पार्थ राऊत, यांचा सहभाग होता . या गीताला सौ. सरोज जोशी व साईराम साखरकर यांची संगीतसाथ लाभली. या कार्यक्रमाला सौ. शितल थोडगे व सौ. समिधा देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समृध्दी थोरात हिने व कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. संगीता भारंबे यांनी केले.या कार्यक्रमाचा उत्कृष्ट असा व्हिडिओ तयार करून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना पाठविला. विदयार्थ्यांनी उत्कृष्टरित्या सादर केलेल्या या कार्यक्रमाचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष अविनाश देव, सचिव मोहन गद्रे, कार्यकारिणी सदस्य सौ. अनघा देव, ब्राह्मण सभा कार्यकारिणी सदस्य, शाळा समिती सदस्य, बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्ती चोपडे, बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर, सर्व शिक्षिका, कर्मचारी यांनी केले आहे.