बाल शिवाजी शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा
दिनांक ०५/०९/२०२४ रोजी स्थानिक बाल शिवाजी शाळेत शिक्षक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सावरकर सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव सर तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर, सौ. कीर्ती चोपडे व शाळेतील सर्व शिक्षिका विद्यार्थी उपस्थित होते.
शिक्षक दिनानिमित्त वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांनी स्वयंशासन हा कार्यक्रम राबवला व त्यानंतर विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वर्ग दहावीची विद्यार्थीनी अंजली कराळे ही होती. या कार्यक्रमाचे संचालन कुणाल वराडे व प्रास्ताविक गिरीश निकम यांनी केले डॉ. राधाकृष्णन यांच्या जीवन चरित्रावर श्रेया डावरे हिने प्रकाश टाकला तसेच राजवीर तारापुरे यानी शिक्षकांचे महत्व सांगितले. शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षक तज्ञ व पद्मश्री पुरस्कार प्राप्त असणाऱ्या अनुताई वाघ व ताराबाई मोडक यांचे शैक्षणिक कार्य शर्वरी काटे हिने विशद केले अशाप्रकारे शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचा समारोप एकात्मता मंत्राने केला.