बाल शिवाजी शाळेत मुक्तछंद उन्हाळी शिबिर जल्लोषात संपन्न!!!!
बाल शिवाजी शाळेत मुक्तछंद उन्हाळी शिबिराचे आयोजन दिनांक 14 ते 24 एप्रिल 2025 दरम्यान करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कीर्ती चोपडे व माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता जळमकर, पर्यवेक्षिका रागिणी बक्षी, किरण मुरूमकार, भारती कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. दहा दिवसाची हे शिबीर अतिशय आनंदात व जल्लोषात पार पडले. या शिबिरात केजी 1 ते वर्ग 4 थी पर्यंतचे एकूण 157 विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांना या शिबिरात विविध हस्तकला, चित्रकला, खेळ, गोष्टी प्रार्थना, गाणी, चांगल्या सवयी आणि स्वसंरक्षणासाठी कराटे शिकविण्यात आले. विद्यार्थ्यांना सहल, चित्रपट विविध कलांचा आनंद घेता आला. बालगटाला क्राफ्ट मध्ये मधमाशी, फुलपाखरे, डस्टबिन, हँडवॉश, नळ, तराजू ह्या विविध वस्तू शिकविण्यात आल्या. वर्ग 1 ते 4 ची मुले फ्रेम, रांगोळी आणि विविध Science toys शिकले. या शिबिराचे मुख्य आकर्षण म्हणजे दहा दिवस मुलांना विविध खाद्य पदार्थांचा आस्वाद घेता आला. प्लास्टिकचे दुष्परिणाम सांगून विद्यार्थ्यांकडून वर्तमानपत्रांची पाकीट तयार करण्यात आली. व ती पाकीट मेडिकल मध्ये जाऊन वितरित करण्यात आली. वृक्षारोपणाचे व पाण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. त्या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी विविध झाडांच्या जमा केलेल्या बियांचे Seed balls तयार केले. तसेच प्लास्टिकचे दुष्परिणाम सांगून विद्यार्थ्यांकडून वर्तमानपत्रांची पाकीट तयार करण्यात आली. व ती पाकीट मेडिकल मध्ये जाऊन वितरित करण्यात आली. समारोपाच्या दिवशी हातात घोषवाक्याचे फलक घेऊन प्रभात फेरी काढून विद्यार्थ्यांनी तयार केलेले Seed balls पालक, रस्त्यावरील लोकांना सर्वांना वितरित करण्यात आले. शाळेतून प्रत्येक विद्यार्थ्याला विविध चरित्रात्मक पुस्तक वितरण करण्यात आले. व बालगटातील विद्यार्थ्यांना चित्रकला वहीचे वाटप करण्यात आले. मुलांना खाऊ आणि आईस्क्रीम वाटण्यात आले. क्राफ्ट प्रदर्शनाचे उद्घाटन शाळेचे पालक श्री. राजकुमार माळवे यांनी केले. त्यावेळेस माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती कीर्ती चोपडे उपस्थित होत्या अशाप्रकारे मुक्तछंद शिबिर आनंदात व हर्षोउल्हासात पार पडले.
