बाल शिवाजी शाळेत मुक्तछंद उन्हाळी शिबिराचे आयोजन
दिनांक -22/04/2024 पासून बाल शिवाजी शाळेत मुक्तछंद उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबीराचे उदघाटन शाळेच्या मुख्याध्यापिका कीर्ती चोपडे टिचर व संगीता जळमकर यांच्या हस्ते करण्यात आले होते. 11 दिवसांचे हे मुक्तछंद शिबीर अतिशय आनंदात व जल्लोषात पार पडले. या शिबिरात वर्ग KG -1 ते चौथीपर्यंतचे एकूण 170 विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांना या शिबिरात विविध हस्तकला, क्राफ्ट, चित्रकला ,खेळ, योगा,प्रार्थना, गायन ,नृत्य ,सहल, मूव्ही इत्यादी विविध कलांचा आनंद घेता आला. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना विविध नवनवीन खेळ, सायंन्स टॉय, कॅलिग्राफी अशा आधुनिक कलांचाही आनंद घेता आला .याशिवाय दररोज असणाऱ्या स्वादिष्ट खाऊचाही विद्यार्थ्यांनी आस्वाद घेतला.तसेच विद्यार्थ्यांनी विविध झाडांच्या जमा केलेल्या बियांचे सीड्स बॉल देखील तयार केले आणि वृक्षारोपणाचे महत्त्व जाणता शेवटच्या दिवशी छोट्याशा प्रभात फेरीचे आयोजन करून विद्यार्थ्यांनी त्या सीड्स बॉलचे वाटप केले व पर्यावरणाचे वृक्षारोपणाचे संदेश देणारी घोषवाक्ये दाखवत प्रभात फेरीची सांगता केली .आपण या देशाचे सुजाण व जबाबदार नागरिक आहोत त्यासाठी आता येणाऱ्या मतदानाचेही महत्त्व विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या घोषवाक्याद्वारे या फेरीत सांगितले .अशा प्रकारे शेवटच्या दिवशी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध क्राफ्टच्या वस्तू ,सायंन्स टॉय, चित्रकला ,कॅलिग्राफीचे प्रदर्शन मांडण्यात आले होते या प्रदर्शनाला सर्व पालक वर्गाने भेट देऊन विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे कौतुक केले. तसेच या प्रदर्शनाला शाळेचे अध्यक्ष अविनाश देव सर, मुख्याध्यापिका कीर्ती चोपडे टीचर संगीता जळमकर टीचर यांनी देखील भेट दिली व विद्यार्थ्यांचे खूप खूप कौतुक केले.