बाल शिवाजी शाळेत महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी
जठारपेठ स्थित ब्राह्मण सभा शिक्षण संकुलांतर्गत बाल शिवाजी प्राथमिक शाळेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्वतंत्र भारताचे दुसरे प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली. हा कार्यक्रम वर्ग ५ वी च्या विद्यार्थ्यांनी सादर केला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून एल.आर.टी. वाणिज्य महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या सहयोगी शिक्षिका डॉ. स्वाती दामोदरे मॅडम लाभल्या होत्या. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली. या कार्यक्रमात निःस्पृह शास्त्रीजीं यांच्याबद्दल माहिती दिव्या चांडक हिने सादर केली. महात्मा गांधीजींची माहिती स्वर्णाभ लांडगे याने आपल्या इंग्रजी भाषणातून सांगितली. तसेच ‘मोठ्या मनाचा छोटा माणूस ही गोष्ट ‘ काव्या पाठक हिने सांगितली. दांडी यात्रेचा प्रसंग वर्ग ५ च्या विद्यार्थ्यांनी सादर केला. ‘दे दी हमे आजादी .. ‘ हे गीत वर्ग ५ च्या विद्यार्थ्यांनी सादर केले. कार्यक्रमाचे संचलन सायली कुळकर्णी हिने केले तर प्रास्ताविक शाळेतील शिक्षिका शुभांगी तिडके यांनी केले. माझी बाल शाळेतर्फे स्व. अण्णासाहेब देव जन्मदिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी डॉ. दामोदरे मॅडम ह्यांनी ‘अच्छा देखो, अच्छा बोलो, अच्छा सुनो गांधीजींच्या या तीन गोष्टी विद्यार्थ्यांनी अंगिकाराव्यात. तसेच शास्त्रीजींच्या साधेपणा, निःस्पृह पणा, निर्मोही व्यक्तिमत्वाचा बोध घेऊन विद्यार्थ्यांनी त्याप्रमाणे आचरण करावे ‘ असा संदेश विद्यार्थ्यांना दिला. कार्यक्रमाची सांगता एकात्मता मंत्राने करण्यात आली. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव, संस्थेचे सचिव श्री. मोहन गद्रे सर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कीर्ती चोपडे, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर, सर्व शिक्षिका, पालकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.