बाल शिवाजी शाळेत जागतिक योगदिन उत्साहात साजरा..
ब्राह्मण सभा अंतर्गत बाल शिवाजी शाळेत 21 जून 2024 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी 25 वर्षापासून युवक करण्यात असलेले योग शिक्षक माननीय श्री अरविंद ज्योध यांनी अध्यक्षस्थान भूषविले. सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली कार्यक्रमाचे संचालन श्रीदत्त ठाकरे यांनी केले तर योगा विषयीची माहिती ईश्वरी खोले हिने उत्तमरीत्या सांगितले. प्राजक्ता सांबारे हिने योगा व्यास केल्याने झालेले सकारात्मक परिणाम आपल्या मनोगतात व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बाल शिवाजी शाळेने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी योग वर्ग घेतला माननीय मनीषा नाईक यांनी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार व इतर आसन शिकवली व मोलाचे मार्गदर्शनही केले. या योगवर्गात सौ गुणबक्षी मोहकार सौ दिशा पंडित या आहार तज्ञांनी विद्यार्थ्यांना चौकस आहाराचे महत्त्व पटवून दिले तर योगतज्ञ आनंद थत्ते यांनी विद्यार्थ्यांना आपल्या भविष्य काळासाठी विद्यार्थी दशे पासून योगाभ्यास करण्याचे महत्त्व पटवून दिले. त्यानंतर माननीय अध्यक्ष यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून योग हा सदृढ निरोगी शरीरासाठी व मनासाठी मानवी जीवनाचा अत्यंत अविभाज्य अंग आहे असा मोलाचा संदेश दिला कार्यक्रमाचा समारोप योग प्रार्थनेने झाला.