बाल शिवाजी शाळेत छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी….
दि. 19 फेब्रुवारी 2025 रोजी बाल शिवाजी शाळा जठारपेठ, अकोला. येथे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव, कार्यक्रम प्रमुख श्री. नरेंद्र देशपांडे, बाल शिवाजी प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्जवलन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन वर्ग 6 वी ची विद्यार्थिनी रेणुका समीर जोशी हिने केले. कार्यक्रमाची प्रास्ताविक सौ. संगीता भारंबे यांनी केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी मराठमोळ्या पोशाखात शिवजयंती साजरी केली. तसेच शाळेतील. रुपश्री दिनेश पांडव हिने जिजाऊ यांचे स्वगत सादर केले. महेश किशोर इंगळे याने शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या कार्यक्रमाला उपस्थित ब्रिटिश लीगल ॲडव्हायझर हेन्री ऑक्झिंडेन याचे मनोगत व्यक्त केले. ओजस्वी अविनाश काठोळे हिने युगप्रवर्तक शिवराय याविषयी आपले मत व्यक्त केले. वर्ग ६ वी च्या विद्यार्थ्यांनी स्वतंत्रवीर सावरकर रचित ‘हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा’ हा पोवाडा सादर केला. शाळेच्या शिक्षिका सौ. शितल थोडके टीचर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून शिवाजी महाराजांचे चरित्र विद्यार्थ्यांना प्रेरणादायी कसे ठरते, याविषयी काही प्रसंगांचे वर्णन करून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रमुख श्री नरेंद्र देशपांडे सर यांनी विद्यार्थ्यांना छोट्या-छोट्या अडचणींनी खचून न जाता आत्मविश्वासाने सामोरे जाण्यास सांगितले तसेच शिवरायांप्रमाणेच अगदी मोजक्या साधनांच्या उपलब्धतेचा काटकसरीने वापर करून कार्य कसे साध्य करावे याबद्दल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला ब्राह्मण सभा कार्यकारणी सदस्य, सर्व शाळा समिती सदस्य, शाळेतील सर्व शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी वर्ग हजर होते. कार्यक्रमाची सांगता एकात्मता मंत्राने झाली.
