बाल शिवाजी शाळेतील विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धांमध्ये सुयश

जेष्ठ नागरिक संघातर्फे घेण्यात आलेल्या संस्कृत पाठांतर स्पर्धेत वर्ग १ ते ४ या गटामध्ये  श्रेया नितीन राहाटे – तृतीय क्रमांक व कस्तुरी सचिन देशपांडे हिला उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त झाले आहे. तसेच वर्ग ५ ते ७ या गटामध्ये वेदांती गिरीष कुळकर्णी हिला  प्रथम क्रमांक तर वेदश्री दत्तात्रय जोशी – व्दितीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे. वर्ग ८ ते १० या गटामधून वैष्णवी किशोर इंगळे – प्रथम क्रमांक, साहिल गजाजन वाकोडे –   तृतीय क्रमांकाचे परितोषिक मिळाले आहे. त्याचप्रमाणे  खंडेलवाल मराठी प्राथमिक शाळेतर्फे आयोजित आंतरशालेय संस्कृत पाठांतर स्पर्धेत पूर्व प्राथमिक गटामधून देवश्री दत्तात्रय  कराळे – प्रथम क्रमांक , स्वर समीर थोडगे –  प्रोत्साहनपर बक्षीस मिळाले आहे आणि शाळेला ट्रॉफी मिळाली आहे. तसेच वर्ग १ ते ४ या गटामधून आरोही राहुल महाशब्दे – व्दितीय क्रमांक, पियूषा राजेश भोंडे – तृतीय क्रमांक व वर्ग ५ ते ७ या गटामधून गार्गी विहार गाडगीळ – प्रथम क्रमांक, सर्वज्ञ मनोज जोशी- तृतीय क्रमांकाचे परितोषिक मिळाले आहे.  आणि शाळेला  ट्रॉफी  मिळाली आहे. वर्ग ८ ते १० या गटामधून संस्कृत या विषयावर उत्तम PPT सादरीकरणासाठी ऋचा अनंत देशपांडे व समृद्धी अजय देशमुख यांना तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. तसेच  
व्यंगचित्रकार गजानन घोंगडे यांच्यातर्फे आयोजित व्यंगचित्र स्पर्धेत  वर्ग ५ ते ७ गटामधून साविका राहुल इंगळे हिला प्रथम क्रमांक, अथर्व विनोद काळपांडे –   तृतीय क्रमांक मिळवला आहे. वर्ग ८ ते १० गटामधून मधुरा महेश मल्हार – प्रथम क्रमांक, शर्वरी विनायक जामकर- तृतीय क्रमांक, ओम दत्तात्रय सोनोने – उत्तेजनार्थ बक्षिसे मिळाली आहेत. तसेच सर्वाधिक विद्यार्थी सहभागाबद्दल शाळेला ट्रॉफी व  रु. १०००/ चे रोख पारितोषिक मिळाले आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन !!