बाल शिवाजी शाळेच्या विद्यार्थ्यांचे शासकीय रेखाकला परीक्षेत सुयश

 अकोला स्थानिक जठारपेठ स्थित बाल शिवाजी शाळेतील विदयार्थ्यांनी रेखाकला परीक्षेत सुयश प्राप्त केले आहे. कला संचालनालयातर्फे घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला परीक्षा एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्राईंग ग्रेड परीक्षा २०२२ यात बाल शिवाजी माध्यमिक शाळेचा रोहन सचिन बोरसे वर्ग ९ वा हा एलीमेंटरी ड्राईंग परीक्षेत महाराष्ट्रातून ३८ वा मेरीट व ईश्वरी राजाराम  म्हैसने  ही इंटरमिजीएट ड्राईंग परीक्षेत महाराष्ट्रातून ५० वी मेरीट आली आहे. दरवर्षी महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात येणाऱ्या दोन्ही परीक्षेला या वर्षी राज्यातून सुमारे साडेसहा लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते. हयातील सुमारे सहा लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रत्येक परीक्षेतून सुमारे १०० विद्यार्थी गुणवत्ता यादीत असतात. या वर्षी अकोल्यातील बाल शिवाजी शाळेने उत्तुंग भरारी घेत प्रत्येक परीक्षेत गुणवत्ता यादीत विद्यार्थ्यांची संख्या वाढविली आहे. शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून प्रत्येक परीक्षेतून एका विद्यार्थ्याने  राज्यातून गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले आहे. विद्यार्थ्यांना चित्रकला शिक्षिका कु. राधा कात्रे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.  

विद्यार्थ्यांच्या मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव, संस्थेचे सचिव श्री. मोहन गद्रे,  कार्यकारिणी सदस्य सौ. अनघाताई देव तसेच सर्व शाळा समिती सद्यस्य, बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्ती चोपडे, बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.संगीता जळमकर तसेच सर्व शिक्षक सर्व कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले आहे.