बाल शिवाजी शाळेच्या विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धांमध्ये सुयश
जठारपेठ स्थित बाल शिवाजी शाळेतील विदयार्थ्यांनी विविध आंतरशालेय स्पर्धांमध्ये सुयश प्राप्त केले आहे. खंडेलवाल इंग्लिश स्कुल तर्फे आयोजित ‘Science Meet 2023’ मध्ये विविध स्पर्धांमध्ये बाल शिवाजी शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यात Science Quiz या स्पर्धेमध्ये एकूण २८ शाळा व ७५ गट सहभागी झाले होते. त्यामध्ये वर्ग ४ च्या श्रीयश विनायक पाठक आणि अर्णव विजय धोत्रे यांच्या गटाने उत्कृष्ट सादरीकरण करत व्दितीय क्रमांक मिळविला. त्यांना प्रशस्तिपत्रक, पारितोषिक मिळवले. या चमूला सौ. रागिणी बक्षी ह्यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
वर्ग ५ चा अर्णव रविंद्र भांबेरे ,वर्ग ६ चा प्रणव सतिश नवले तसेच वर्ग ७ चा आयुष गजानन जळमकर आणि वर्ग ८ ची समृद्धी हरिशचंद्र काळंके या गटाने Do It Yourself मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला आहे. त्यांना प्रशस्तिपत्रक, पारितोषिक मिळाले. तसेच यापूर्वी युवा दिनानिमित्त घेण्यात आलेल्या आंतरशालेय संस्कृत पाठांतर स्पर्धेत के.जी. २ ची आदिनाथ सारंग सोमण – प्रथम क्रमांक प्राप्त करून प्रशस्तिपत्रक व रोख पारितोषिक मिळविले. वर्ग ४ च्या वरदा विक्रांत कुळकर्णी – प्रथम क्रमांक, वर्ग २ री चा – निहिर जितेंद्र जोशी – व्दितीय क्रमांक व वर्ग ६ ची राजस्वी नारायण शेगोकार – व्दितीय क्रमांक, वर्ग ८ च्या आत्मजा संजय राऊत – तृतीय क्रमांक मिळविला. त्यांना प्रशस्तिपत्रक व रोख पारितोषिक मिळाले आहे.
विद्यार्थ्यांच्या मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री.अविनाश देव, संस्थेचे सचिव श्री. मोहन गद्रे , कार्यकारिणी सदस्य सौ. अनघाताई देव,तसेच सर्व शाळा समिती सद्यस्य, बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.कीर्ती चोपडे, बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.संगीता जळमकर, तसेच सर्व शिक्षक, सर्व कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले आहे.