बाल शिवाजी शाळेच्या विद्यार्थ्यांचे सुयश
खंडेलवाल इंग्लिश स्कुल आणि कुतूहल संस्कार केंद्र, अकोला तर्फे वर्ग ४ थी साठी आयोजित ‘Maharashtra State Inter School Science Meet 2022’ या स्पर्धेमध्ये राज्यातून एकूण ५७ विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेसाठी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेत बाल शिवाजी प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी पियुषा राजेश भोंडे ही State Topper ठरली व अधिराज मंगेश मुरूमकार याची व्दितीय क्रमांकावर निवड करण्यात आली. तसेच अंतिम फेरीत होणाऱ्या Science Quiz मध्ये पियुषाने प्रथम क्रमांक पटकावला तर अधिराज मंगेश मुरूमकार हा तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रक, रोख पारितोषिक जाहीर करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या सुयशाबद्दल विद्यार्थ्यांचे व तसेच त्यांच्या मार्गदर्शक शिक्षिकांचे शाळेचे अध्यक्ष श्री.अविनाश देव, सचिव प्रा.श्री. मोहन गद्रे, कार्यकारिणी सदस्य सौ. अनघा देव,तसेच सर्व शाळा समिती सदस्य, बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.संगीता जळमकर, बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.कीर्ती चोपडे, सर्व शिक्षक, सर्व कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले आहे.