बाल शिवाजी शाळेच्या विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी

भारताच्या विज्ञान व तंत्रज्ञान शिक्षण प्रसार मंडळ व NCERT यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी विज्ञान मंथन २०२१ ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेत बाल शिवाजी शाळेतील संस्कृती विनायक पाठक (वर्ग ८ वा) जिल्ह्यातून प्रथम, ऋतुजा घोगरे   (वर्ग ८ वा)  जिल्ह्यातून व्दितीय, ओजस जोशी  (वर्ग १० वा ) जिल्ह्यातून प्रथम, मधुरा किडिले (वर्ग १० वा) जिल्ह्यातून  व्दितीय या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केले आहे.  वरील सर्व विद्यार्थ्यांची या परीक्षेकरिता आयोजित राज्यस्तरीय शिबिरासाठी निवड झाली आहे.      

सर्व यशस्वी  विद्यार्थ्यांचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.अविनाश देव, संस्थेचे सचिव श्री.विश्वनाथ गद्रे,कार्यकारिणी सदस्य सौ. अनघाताई देव,ब्राह्मण सभा कार्यकारिणी सदस्य, सर्व शाळा समिती सदस्य, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.संगीता जळमकर, प्राथामिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.कीर्ती चोपडे, शाळेतील सर्व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले. पुढील राज्यस्तरीय शिबिरा करिता शुभेच्छा दिल्या.