बाल शिवाजी शाळेच्या विद्यार्थ्यांनी मिळविले घवघवीत यश

महाराष्ट्र प्रदेश तथा अकोला जिल्हा युवक काँग्रेस द्वारा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त्य ‘भव्य निबंध स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती.त्यात स्थानिक जठारपेठ स्थित बाल शिवाजी शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले होते. ही स्पर्धा दोन गटात घेण्यात आली. निबंधाचे विषय- गांधीजी मला भेटले,गांधीजी जे मला समजले,गांधीवाद-वैश्विक शांततेसाठी सर्वोत्तम पर्याय, असहकारआणि छोडो भारत या संकल्पनांची आज आवश्यकता आहे का? हे होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे. इयत्ता ५ ते ७ या गटात वर्ग ५ च्या संस्कृती विनायक पाठक हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला,तिने ३००१/- चे रोख पारितोषिक पटकाविले. वर्ग ६ च्या कृष्णा अविनाश बोर्डे ह्याने व्दितीय क्रमांक प्राप्त केला, त्याने ३००१/- चे रोख पारितोषिक पटकाविले.वर्ग ७ च्या राधा शशांक वांबूरकर हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला तिने २००१/- चे रोख पारितोषिक पटकाविले. तर इयत्ता ८ ते१० या गटात वर्ग ९च्या शिवम गजानन चतरकर ह्याने व्दितीय क्रमांक प्राप्त केला त्याने २००१/- चे रोख पारितोषिक पटकाविले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री.अविनाश देव,सचिव श्री.मोहन गद्रे,कार्यकारिणी सदस्या सौ.अनघा देव,शाळा समिती सदस्य, मुख्याध्यापिका सौ.किर्ती चोपडे,सौ.शोभा अग्रवाल,सौ.संगिता जळमकर,सौ.भारती कुळकर्णी,सर्व शिक्षिका,कर्मचारी वृंद यांनी कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.