बाल शिवाजी शाळेच्या विद्यार्थ्यांचे MTS परीक्षेत दैदिप्यमान यश!

मॉडर्न एज्युकेशन सोसायटी अंतर्गत वाडिया कॉलेज पुणे तर्फे आयोजित महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेत बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या 14 विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त करून शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनती, चिकाटी आणि शिक्षिकांच्या मार्गदर्शनामुळे हे यश संपादन केले आहे.

वर्ग आठवीची वेदश्री विशाल बकाल हीने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक, आदिनाथ श्रीपाद पुसेगावकर याने जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक तर ऐश्वर्या महेंद्र कोलटक्के हिने जिल्हास्तरावर तिसरा क्रमांक पटकावला आहे.

वर्ग 8 वी ची राजश्री नारायण शेगोकार, वर्ग 9 चे आयुष धीरज भिसे, आनंदी योगेश सरप, वर्ग 10 वी चे अंजली अजय कराळे, अदिती गणेश तीहिले, हे विशेष पारितोषिकाचे मानकरी ठरले तर वर्ग आठवीचे आदित्य योगेश आवळे, रेवती रमण घोगरे, प्रणव सतीश नवले, लावण्या ललित वक्ते वर्ग नववीचे श्रीप्रसाद पंकज देशमुख वर्ग दहावीचे पयोष्णी विक्रम घाईट हे प्रोत्साहन पर पुरस्काराचे मानकरी ठरले.यापैकी अंजली अजय कराळे व अदिती गणेश तीहिले यांची द्वितीय फेरी- मुलाखतीसाठी निवड झाली आहे.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव, सचिव श्री. मोहन गद्रे, कार्यकारिणी सदस्या सौ. अनघा ताई देव, शाळा समिती सदस्य यांनी व बालशिवाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कीर्ती चोपडे तसेच सर्व शिक्षिका, कर्मचारी वृंद, यांनी भरभरून कौतुक केले.