बाल शिवाजी शाळेच्या विद्यार्थ्यांचे सुयश

जठारपेठ स्थित बाल शिवाजी शाळेतील विदयार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सुयश प्राप्त केले.खंडेलवाल इंग्लिश स्कुल तर्फे आयोजित ‘Science Meet 2018’ मध्ये विविध स्पर्धांमध्ये बाल शिवाजी शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते.

त्यात Science Quiz मध्ये वर्ग ४च्या सक्षम श्रीहरी बेदरकर आणि संस्कृती विनायक पाठक यांच्या गटाने उत्कृष्ट सादरीकरण करत प्रथम क्रमांक मिळविला. त्यांना प्रशस्तिपत्रक व रोख पारितोषिक मिळाले तसेच शाळेला रनींग ट्रॉफी मिळाली .वर्ग ६ च्या मधुरा प्रदीप किडिले आणि ओजस श्रीकांत जोशी या गटाने Do It Yourself मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला.

त्यांना प्रशस्तिपत्रक व रोख पारितोषिक मिळाले. ‘Solutions for the Revolution’ या स्पर्धेत Solution for traffic problem of Akola या विषयावर प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून द्वितीय क्रमांक प्राप्त केला.

तसेच यापूर्वी घेण्यात आलेल्या संस्कृत पाठांतर स्पर्धेत के.जी. १ ची प्रचिती उज्वल चोरे हिने तृतीय क्रमांक प्राप्त करून प्रशस्तिपत्रक व रोख पारितोषिक मिळविले.वर्ग ४ च्या गार्गी विहार गाडगीळ व वर्ग ७ च्या चैत्राली प्रशांत जोशी यांनी प्रथम क्रमांक मिळविला.त्यांना प्रशस्तिपत्रक व रोख पारितोषिक मिळाले. तसेच शाळेला रनींग ट्रॉफी मिळाली .गौरी सुधीर मिसुरकर या वर्ग ९ च्या विद्यार्थिनीने द्वितीय क्रमांक प्राप्त करत प्रशस्तिपत्रक व रोख पारितोषिक पटकावले.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष श्री.दादासाहेब देव, सचिव प्रा.श्री. मोहन गद्रे सर, कार्यकारिणी सदस्या सौ. अनघा देव,तसेच सर्व शाळा समिती सद्यस्य, मुख्याध्यापिका सौ.शोभा अग्रवाल, सौ.संगीता जळमकर, सौ.कीर्ती चोपडे, सौ.भारती कुळकर्णी तसेच सर्व शिक्षक, सर्व कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले आहे.