बाल शिवाजी शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे तर्फे घेण्यात येणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत बाल शिवाजी शाळेचे विद्यार्थी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त करून शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत.पूर्व उच्च प्राथमिक परीक्षेत इयत्ता ५ वी चे १९ विद्यार्थी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता ८ वी चे १७ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत.

वर्ग ५ च्या भक्ती मेन हिने जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान मिळवला तर गौरी साबळे,चैतन्य माळी,कृष्णा बोर्डे,शरयू चतरकर,नचिकेत सहस्रबुद्धे,ज्ञानेश्वरी झापे,कांचन कवडे,वैष्णवी हुरबडे, मंजिरी देशमुख,अवंती राजूरकर,श्रेया पोफळी,सिद्धी भगत,जीजा देशमुख,सर्वेश बकाल,मधुरा उपःशाम,अनघा मंगळे,समिक्षा नवले,आदित्य जायले या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवून हे शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत.

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता ८ वी च्या जान्हवी कोळमकर,गौरी गाडगीळ,अमृता बाहेकर,ख़ुशी मोहोड,गौरी वाघाडकर,समृद्धी खडसे,अबोली पत्की,अक्षया बाहेकर,ऋत्विज लांडगे, कैवल्य जोशी,स्नेहल अरबाळ,ओजस्वी बोर्डे,रसिका गोसावी,सई देशपांडे,सोहम देशमुख,कोमल पाटणकर,आभा ठोके या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवून हे शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री.अविनाश देव,सचिव श्री.मोहन गद्रे,कार्यकारिणी सदस्या सौ.अनघा देव,शाळा समिती सदस्य,मुख्याध्यापिका सौ.शोभा अग्रवाल,सौ.किर्ती चोपडे,सौ.संगिता जळमकर,सौ.भारती कुळकर्णी,सर्व शिक्षिका,कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले.