बाल शिवाजी शाळेचे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत..

महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे तर्फे १२ ऑगस्ट २०२१ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत बाल शिवाजी शाळेचे विद्यार्थी  जिल्हास्तरीय  गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त करून शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. वर्ग ५ च्या आयुष गजानन जळमकर  याने जिल्ह्यातून ३ रा येण्याचा मान मिळवला तर वर्ग ८ वी च्या भक्ती मनिष मेन हिने  जिल्ह्यातून  ५ वा येण्याचा मान मिळवला आहे. पूर्व उच्च प्राथमिक परीक्षेत जिल्हास्तरावर इयत्ता ५ वी चे २२ विद्यार्थी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता ८ वी चे १८ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत.पूर्व उच्च प्राथमिक परीक्षेत इयत्ता वर्ग ५ वी च्या जिल्हास्तरावर  शौर्य राजीवकुमार मोकळकर, अदिती शंकर पाटील, आयुष धिरज भिसे, श्रीप्रसाद पंकज देशमुख, धनश्री धनंजय चव्हाण, कस्तुरी सचिन देशपांडे, युगंधर नीलेश पाकदुने,सोनाक्षी मधुकर दावेदार, सुहानी रामकृष्ण निनाळे, समृद्धी गजानन थोरात, ओम शेखर सोळंके, समीक्षा किशोर घोडे, रेवती प्रविण कुकडे, आरोही राहुल महाशब्दे, आराध्य प्रशांत जोशी, आनंदी अनंत देशमुख, वल्लरी श्रीकांत रेलकर, मृणाल सुनील पद्मने, गिरीजा चंद्रशेखर दळवी, पियुष अविनाश कावरे, पियुष नरेश काळे  या सर्व विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवून हे शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत.    पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता ८ वी च्या जिल्हास्तरावर  कृष्णा अविनाश बोर्डे, सर्वेश अतुल बकाल, वैष्णवी अमित हुरबर्डे , चैतन्य विश्वंभर माळी, शरयू प्रकाश चतरकर, समीक्षा सतिश नवले, गौरी प्रशांत साबळे, मंजिरी संतोष देशमुख, जिजा प्रशांत देशमुख, ज्ञानेश्वरी धनंजय झापे, ऋतुराज सुरेश कातखेडे, अवंती संतोष राजुरकर, कांचन राजेश कवडे, तेजस संजय खोसे, नचिकेत संदिप सहस्त्रबुद्धे, मधुरा अभय उपश्याम, श्रेया चंद्रकांत पोफळी  या सर्व विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवून हे शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत.    सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री.अविनाश देव,सचिव श्री.मोहन गद्रे,कार्यकारिणी सदस्य सौ.अनघा देव,शाळा समिती सदस्य, बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.संगिता जळमकर, बाल  शिवाजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्ती चोपडे,सर्व शिक्षिका,कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले.