बाल शिवाजी शाळेची माध्यमिक शालांत परीक्षेत उत्तुंग भरारी
स्थानिक जठारपेठ स्थित बाल शिवाजी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी दरवर्षी प्रमाणे या वर्षीही घवघवीत यश प्राप्त केले असून सलग १९ वर्षांपासून शाळेने १००% निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत बाल शिवाजी शाळेने आपली उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवत ९० पैकी ९० विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत असून त्यापैकी ६२ विद्यार्थी ९०% च्या वर आहेत. जान्हवी दिनेश कोळमकर हिने सर्वाधिक ९८.६० % गुण मिळवून शाळेत प्रथम येण्याचा मान मिळवला.
तसेच गौरी संदीप वाघाडकर हिने ९८.४०% गुण मिळवून शाळेत व्दितीय तर अमृता राजेश बाहेकर ९८.२० % गुण मिळवून शाळेतून तृतीय आली तर ऋत्विज गुंजन लांडगे ९७.६०% हा चौथा तर प्राची संतोष खांबलकर हिने ९७.४०% गुण प्राप्त करून आपले पाचव्या क्रमांकाचे स्थान निश्चित केले आहे.संस्कृत विषयात २१ विद्यार्थ्यांना १०० पैकी १०० गुण, गणित विषयात ४ विद्यार्थ्यांना तर विज्ञान विषयात एका विद्यार्थ्यांला १०० पैकी १०० मिळाले आहेत.
गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.अविनाश देव, संस्थेचे सचिव श्री.विश्वनाथ गद्रे,कार्यकारिणी सदस्य सौ. अनघाताई देव,ब्राह्मण सभा कार्यकारिणी सदस्य, सर्व शाळा समिती सदस्य, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.संगीता जळमकर, प्राथामिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.कीर्ती चोपडे व शाळेतील सर्व शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले.