बाल शिवाजी प्राथमिक शाळेत ७४ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

स्थानिक जठारपेठ स्थित बाल शिवाजी प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिन  कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून  उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान संस्थेचे अध्यक्ष श्री.अविनाश देव यांनी भूषविले. सर्वप्रथम माध्यमिक शालांत परीक्षेत शाळेतून प्रथम आलेली विद्यार्थीनी जान्हवी दिनेश कोळमकर हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.  याप्रसंगी जान्हवी दिनेश कोळमकर हिने आपले मनोगत व्यक्त केले.   

देशाच्या ७४ व्या स्वातंत्र्यदिनी  संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव यांनी कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव बघता कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे व आपल्या आरोग्याची काळजी घेणे असा संदेश सर्वांना याप्रसंगी दिला.       

या कार्यक्रमास संस्थेचे सचिव श्री.मोहन गद्रे,ब्राह्मण सभा सदस्य,कार्यकारिणी सदस्य,कार्यकारिणी सदस्या सौ.अनघा देव,शाळा समिती सदस्य डॉ. जयंत मसने, सौ. रेणुका भाले , प्राथमिक शाळेच्या  मुख्याध्यापिका   सौ.किर्ती चोपडे, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ .संगीता जळमकर, सर्व शिक्षिका,कर्मचारी वृंद उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  सौ. श्रद्धा रेलकर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता ‘वंदे मातरम’ ने झाली.  तसेच स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून वर्ग ७ च्या युवराज गोदे, अवनी देशपांडे, संस्कृती पाठक, अदिती तराळे, गार्गी गाडगीळ, श्रेयस पाटील या विद्यार्थ्यांनी क्रांतिकारकांची माहिती, देशभक्तीपर गीत याचा उत्कृष्ट असा व्हिडिओ तयार केला व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना पाठवला.