बाल शिवाजी प्राथमिक शाळा व माझी बाल शाळेत गोकुळाष्टमी, दहीहंडी उत्साहात संपन्न….
जठारपेठ स्थित बाल शिवाजी प्राथमिक शाळेत सावरकर सभागृहात गोकुळाष्टमी व दहीहंडीचा कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे संचलन वर्ग ३ री ची ज्ञानदा देशपांडे व वरद गंगाखेडकर यांनी केले. श्रीकृष्ण प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत रियांश कुळकर्णी याने पुष्प देऊन केले. सर्वप्रथम श्रीकृष्ण स्वगत समर्थ ढोरे याने सादर करण्यात आले. अभिश्री खपली हिने श्रीकृष्ण व अर्जुनाची गोष्ट सादर केली. ‘ श्रीकृष्णाचे विठ्ठल रूप ‘ ही नाटिका सादर करण्यात आली. नाटिकेचे निवेदन पार्थ घाईट याने केले.श्रीविष्णूच्या भूमिकेत ओजस कुळकर्णी, लक्ष्मी च्या भूमिकेत अनन्या निनाळे, राधाच्या भूमिकेत गार्गी भाले, श्रीकृष्णाच्या भूमिकेत पार्थ शुक्ला, रुख्मिणीच्या भूमिकेत पर्वणी पटेल, विठ्ठलाच्या भूमिकेत राम पाटील, भक्त पुंडलिकाच्या भूमिकेत पार्थ तिहिले, पुंडलिकाच्या आई- वडिलांच्या भूमिकेत अबोली बंडगर व अर्णव पटके, व सहकारी विद्यार्थी समृद्धी चव्हाण, जान्हवी रेवस्कर, गार्गी ताले हे विद्यार्थी सहभागी होते. यशोदेचे स्वगत अनुश्री भाले हिने सादर केले. ‘हरी सुंदर, नंद मुकूंद …. ‘ हे गीत विद्यार्थिनींनी सादर केले. सर्व विद्यार्थिनींनी ‘किसना है … ‘ या गीतावर बहारदार नृत्य सादर केले. ‘कृष्णा सारखा नि:स्वार्थ मैत्रीचा आदर्श ठेवावा.तसेच पाकिटबंद खाद्यपदार्थांचा वापर टाळून गोपाळकाल्याप्रमाणे पौष्टीक खाद्यपदार्थांचा आपल्या आहारात समावेश करावा व शाळेत दिलेल्या आहार तक्त्याचे पालन करावे ‘ असा संदेश प्रमुख अतिथी बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या सह. शिक्षिका सौ.अंजली महाजन यांनी आपल्या मार्गदर्शनातून दिला. सर्व विद्यार्थ्यांनी दहीहंडीचा कलाविष्कार सादर केला. कार्यक्रमासाठी वर्ग शिक्षिका सौ.निलीमा चव्हाण, सौ. राजश्री पांडव, सौ. अंजली देशमुख, नृत्य शिक्षिका तनुश्री भालेराव, संगीत शिक्षक श्री.पुरुषोत्तम कोरान्ने, राघव बावने तसेच बाल शिवाजी शाळेच्या पर्यवेक्षिका सौ. रागिणी बक्षी यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमानंतर सर्वांना प्रसाद देण्यात आला.
या कार्यक्रमाला बाल शिवाजी प्राथामिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.कीर्ती चोपडे, बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.संगीता जळमकर, शाळा समिती सदस्य सौ. रेणुका भाले व शाळेतील शिक्षिका व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता श्रीकृष्णाच्या नामगजरात झाली.
त्याचप्रमाणे दि. ७/९/२०२३ रोजी स्व. अण्णासाहेब देव सभागृहात गोकुळाष्टमी चा कार्यक्रम माझी बाल शाळेच्या वर्ग KG II च्या चिमुकल्यांनी उत्कृष्टपणे सादर केला. प्रथम रावी पारसकर हिने गवळण सादर केली. त्यानंतर कृष्णजन्म ही सुंदर नाटिका सादर करण्यात आली. नाटिकेत स्वराज ताले, वैभवी पोटे, श्लोक बुटे, प्रियांश वसतकर, मोक्षदा सेनाड हे विद्यार्थी सहभागी होते. कृष्ण जन्मानंतर जल्लोषात विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णचा गजर केला. शर्विल फुंडकर ह्याने ‘ दैवी भविष्यवाणी’ यावर गोष्ट सादर केली. नंतर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करून दहीहंडीचा जल्लोष केला. कार्यक्रमाचे संचालन पर्वणी पाठक व स्वानंदी काळे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. नयना जोशी यांनी केले. कार्यक्रमानंतर बाल गोपाळांना प्रसाद देण्यात आला.
या कार्यक्रमाला बाल शिवाजी प्राथामिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.कीर्ती चोपडे, बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.संगीता जळमकर, बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या पर्यवेक्षिका सौ. रागिणी बक्षी,बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या पर्यवेक्षिका कु. किरण मुरूमकर, माझी बाल शाळेच्या पर्यवेक्षिका सौ. भारती कुळकर्णी, शाळेतील शिक्षिका, पालक वर्ग व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.