बाल शिवाजीच्या बाल वैज्ञानिकांची झेप
शालेय जीवनात विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित व्हावा या उद्देशाने मुंबई विज्ञान अध्यापक मंडळ तर्फे आयोजित डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक व्हा या स्पर्धेत बाल शिवाजी शाळेच्या एकूण १० विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली. या स्पर्धेत त्यांची व्दितीय स्तर प्रात्यक्षिक परीक्षेसाठी निवड झाली आहे.
शाळेतील वर्ग ६ तील मधुरा प्रदीप किडीले व ओजस श्रीकांत जोशी तर वर्ग ९ तील प्रज्वल घोगले,आस्था अग्रवाल,शैलजा लोहिया,यश खुमकर,युवराज राऊत,हर्षल गजभिये,साक्षी दुतंडे व मिताली पाकळ या विद्यार्थ्यांची व्दितीय स्तराकरिता निवड झाली आहे. तीन टप्प्यात घेण्यात येणाऱ्या या परीक्षेतील दुसरा टप्पा प्रात्यक्षिक फेरीचा असून त्यातून, १० टक्के विद्यार्थ्यांची निवड तिसऱ्या टप्प्यातील मुलाखतीसाठी होते .
त्यात प्रकल्प सादरीकरण व मुलाखत असे स्वरूप असते. प्रात्यक्षिक परीक्षा पुणे येथे डिसेंबर मध्ये होणार आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष श्री.दादासाहेब देव, सचिव प्रा.श्री. मोहन गद्रे सर, मुख्याध्यापिका सौ.शोभा अग्रवाल, सौ.संगीता जळमकर, सौ.कीर्ती चोपडे, सौ.भारती कुळकर्णी तसेच सर्व शिक्षक, शाळा समिती सद्यस्य, सर्व कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.