दोन बाल विज्ञान प्रकल्प  विभागीय स्तरावर 

स्थानिक जठारपेठ स्थित बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या वर्ग ६ च्या विद्यार्थ्यांचे  विज्ञान प्रकल्प विभागीय स्तरावर निवडण्यात आले आहेत. 

भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे दरवर्षी  राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचे आयोजन करण्यात येते.  २१ नोव्हेंबरला online  पद्धतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय प्रकल्प सादरीकरणात एकूण ३२ प्रकल्पांचा समावेश होता. ३२ पैकी ६ प्रकल्पांची विभागीय स्तरावर निवड करण्यात आली. त्यामध्ये  बाल शिवाजी शाळेच्या २ प्रकल्पांची  विभागीय स्तरावर निवड करण्यात आलेली आहे .  शाळेतील इयत्ता ६ च्या विद्यार्थ्यांनी  प्रकल्प सादर केले. त्यापैकी use of waste material which get collected from kitchen chimney हा प्रकल्प प्रणव सतीश नवले व श्रीविद्या स्वप्निल करंडे यांनी सादर केला. यासाठी त्यांना प्रिती निंबाळकर व सौ.मीना मुरूमकार यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच  Reuse of waste thermocol for  making easy to handle pots  यामधील सहभागी विद्यार्थी वेदश्री विशाल बकाल व  पयोष्णी प्रसाद देशमुख यांनी सादर केला. यासाठी त्यांना सौ. संगीता भारंबे व सौ. श्रद्धा रेलकर  या शिक्षिकेंचे मार्गदर्शन लाभले.   सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे   कौतुक संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.अविनाश देव, संस्थेचे सचिव श्री.विश्वनाथ गद्रे,कार्यकारिणी सदस्य सौ. अनघाताई देव,ब्राह्मण सभा कार्यकारिणी सदस्य, सर्व शाळा समिती सदस्य, 

प्राथामिक शाळेच्या  मुख्याध्यापिका सौ.कीर्ती चोपडे ,माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.संगीता जळमकर व शाळेतील सर्व शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले.