दि. 4 जाने. 2026 रोजी खंडेलवाल सरस्वती शिशु मंदिर शाळा अकोला येथे आंतरशालेय मनाचे श्लोक व सूर्यनमस्कार स्पर्धेत बाल शिवाजी शाळेच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश…………

अकोला येथील खंडेलवाल सरस्वती शिशु मंदिर येथे दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी आंतरशालेय मनाचे श्लोक पाठांतर व सूर्यनमस्कार स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत बाल शिवाजी प्राथमिक शाळा, जठारपेठ, अकोला येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले

मनाचे श्लोक आंतरशालेय पाठांतर स्पर्धेत

नर्सरी गटात कविशा इंगळे हिने द्वितीय क्रमांक, तर रमा देशपांडे हिला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.

के.जी.–१ व के.जी.–२ गटात लावण्या नेमाडे हिने प्रथम क्रमांक, स्वर्णित झाडे हिने द्वितीय क्रमांक, तर अनायका काळे हिला उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले.

पहिली व दुसरी वर्ग गटात अमृता कराळे हिने तृतीय क्रमांक, तर शर्विल फुंडकर व शांभवी कुलकर्णी यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले.

तिसरी व चौथी वर्ग गटात ज्ञानेश मराठे याने द्वितीय क्रमांक पटकावला.

याचबरोबर झालेल्या सूर्यनमस्कार स्पर्धेत

डी गट व ई गट या दोन्ही गटांत बाल शिवाजी शाळेने द्वितीय क्रमांक मिळवून शाळेस दोन पारितोषिके प्राप्त केली.

वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून ही स्पर्धा १५ फेब्रुवारी २०२६ रोजी पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहे.

या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे व पालकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन! 🎊💐