दि. 01/03/2025 रोजी अहिल्यादेवी महिला व शिक्षण प्रसारक मंडळ, अकोला यांच्या पुढाकाराने मा. जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथील नियोजन भवन येथे झाली असून स्थानिक 35 शाळांचे विद्यार्थी आणि शिक्षक यात सहभाग आहेत. परिषदेमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शन, शास्त्रीय सादरीकरणे आणि चर्चासत्रे आयोजित केले.
अकोला शहर व परिसरातील पर्यावरण समस्यांचे सखोल अध्ययन करून त्यावर ठोस उपाययोजना करण्याच्या उद्देशाने आयोजित “पर्यावरण परिषद २०२५” संदर्भात पत्रकार परिषद घेतली गेली. या परिषदेमध्ये विद्यार्थी पर्यावरण प्रदूषणाचे विविध घटक अभ्यासून त्यावर चर्चा करण्यात आणि ठोस निर्णय घेतले जातील
परिषदेमध्ये वायू, जल, आणि घनकचरा प्रदूषणासह जैवविविधता संवर्धन, प्लास्टिक टाळणी, पुनर्वापर आणि निसर्गस्नेही जीवनशैली यावर भर दिला आहे. विद्यार्थी विविध प्रयोग, अहवाल, आणि प्रत्यक्ष निरीक्षणांद्वारे पर्यावरणीय समस्या मांडतील व त्यावर उपाय शोधतील.
