तानसेन संगीत विद्यालयातर्फे आयोजित गीत गायन स्पर्धा संपन्न
स्थानिक जठारपेठ येथील ब्राह्मण सभा अंतर्गत सावरकर सभागृहामध्ये ‘तानसेन संगीत विद्यालय तर्फे ‘ कवी सुधीर मोघे रचित गायन स्पर्धा संपन्न झाली. जवळपास २००३ पासून ही स्पर्धा वेगवेगळ्या विषयावर आंतरशालेय स्तरावर घेतली जाते. यावर्षी हे स्पर्धेचे हे १५ वे वर्ष होते. स्पर्धेत १५ शाळेतील ३० विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
हे स्पर्धा दोन गटात घेण्यात आली. अ गट ५ ते ७ व ब गट ८ ते १० या वर्गाचा समावेश होता. या स्पर्धेत अ गटातून बालशिवाजी शाळेचा श्रेयस पाटील प्रथम तर प्रभात किड्स ची स्वराली चापके दिव्तीय, बालशिवाजी शाळेची मधुरा मल्हार उत्तेजनार्थ या प्रमाणे पारितोषिके प्राप्त केली. त्याचप्रमाणे ब गटामध्ये हिंदू ज्ञानपीठचा ओम देवपूजे प्रथम, कोठारी कॉन्व्हेंट ची ध्रुवी शहा दिव्तीय,
ज्युबिली इंग्लिश शाळेची समीक्षा अनासाने उत्तेजनार्थ याप्रमाणे पारितोषिके प्राप्त केली. या वैयक्तिक गीत गायन स्पर्धेत परीक्षक म्हणून प्रा. निखील देशमुख व सौ. मीनाताई अनासाने यांनी काम पाहिले. स्पर्धेनंतर बक्षीस वितरण संस्थेचे सचिव प्रा. मोहन गद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे सचिव प्रा.गद्रे सर, मुख्याध्यापिका, सर्व शाळेमधील संगीत शिक्षक, पालक वर्ग, विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन संगीत शिक्षिका सौ. सरोज जोशी यांनी केले. प्रास्ताविक प्रा.गद्रे ह्यांनी केले. आभार प्रदर्शन प्रशांत कोरान्ने यांनी केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली.