तानसेन संगीत विद्यालयाचे यश

स्थानिक जठारपेठ येथील ब्रांह्मण सभा अकोला अंतर्गत तानसेन संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय गांधर्व महामंडळ मिरज येथील शास्त्रीय संगीत परीक्षा २०१८ ची प्रारंभिक व प्रवेशिका प्रथम यामध्ये विशेष यश मिळविले.प्रारंभिक गायन व तबला वादन ह्यांत ईश्वरी खोले,भक्ती कावरे,वेदांत वक्ते,स्वानंद मोडक,निखिलेश वाखारकर,कुणाल वराडे,विवेक सोळंके,रोहन बोरसे,अनन्य अंधारे,चिन्मय चव्हाण,राजवीर तारापूरे हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

तसेच प्रवेशिका गायन व तबला वादन ह्यांत वैष्णवी लोहित,अर्पिता ढोरे,धनश्री हुतके,तनुश्री दाभाडे,प्राजक्ता सांबारे, वैष्णवी खोले,योगिनी शिंदे,निरल निखाडे,प्रणव लोहित,आदित्य गाडगे,साईराम साखरकर,शौनक देशपांडे हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले.दरवर्षी प्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखली.गायनाचे मार्गदर्शन सौ.सरोज जोशी तर तबला वादनाचे मार्गदर्शन श्री.पुरषोत्तम कोरान्ने यांनी केले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री.अविनाश देव,सचिव श्री.मोहन गद्रे , कार्यकारिणी सदस्या सौ.अनघा देव,शाळा समिती सदस्य,मुख्याध्यापिका सौ.शोभा अग्रवाल,सौ.किर्ती चोपडे,सौ.संगिता जळमकर,सौ.भारती कुळकर्णी,सर्व शिक्षिका,कर्मचारी वृंद यांनी
कौतुक केले.