डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेत बाल शिवाजी शाळेचे यश….
डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेत बाल शिवाजी शाळेचे यश
ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परीक्षेत वर्ग सहावीतील १३ व वर्ग नववीतील १० विद्यार्थ्यांनी पहिल्या टप्प्यात उत्कृष्ट कामगिरी करत द्वितीय फेरी (प्रात्यक्षिक परीक्षा) साठी पात्रता मिळविली आहे.
ही प्रतिष्ठित स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन व संशोधनाची आवड निर्माण करण्यासाठी घेतली जाते. या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन व पालकांचे सहकार्य महत्त्वाचे ठरले आहे. या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापिका व शिक्षकवर्ग यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील फेरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
