डॉ.  होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेमध्ये बाल शिवाजी शाळेच्या विद्यार्थ्यांचे  सुयश 

 मुंबई विज्ञान अध्यापक मंडळातर्फे दरवर्षी डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा वर्ग ६ व ९ साठी घेण्यात येते. ही परीक्षा लेखी, प्रात्यक्षिक व प्रकल्प सादरीकरण अशा तीन स्तरावर घेण्यात येते.  डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा २०२३-२४ मध्ये बाल शिवाजी शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्तम यश संपादन केले आहे.या स्पर्धेच्या प्रात्यक्षिक परीक्षेच्या दुसऱ्या फेरीसाठी वर्ग ६ वी ची निर्मिती संतोष हाडोळे, अर्णव रविंद्र भांबेरे, अंशुमन धनंजय धोत्रे, अधिराज मंगेश मुरूमकार, जय संदिप पारसकर तसेच वर्ग ९ ची  अंजली अजय कराळे, समृद्धी हरिश्चंद्र काळंके, ईश्वरी गणेश डांगे या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. 

विद्यार्थ्यांनी  मिळविलेल्या या यशाबद्दल संस्थेचे  अध्यक्ष श्री.अविनाश देव, संस्थेचे सचिव श्री. मोहन गद्रे, संस्थेच्या कार्यकारिणी सदस्य सौ.अनघाताई  देव, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्ती चोपडे,  शिक्षक वृंद  व कर्मचारी यांनी कौतुक केले आहे. तसेच दुसऱ्या फेरीकरिता शुभेच्छा दिल्या आहेत.