गीतगायन स्पर्धेत बाल शिवाजी शाळेचे यश
विद्याभारती विदर्भ अकोला तर्फे देशभक्तीपर समूहगीत गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शहरातील ३२ शाळांनी सहभाग घेतला होता. स्पर्धा ३ गटात आयोजित करण्यात आली होती. त्यापैकी बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या वर्ग १ ते ४ ‘अ’ या गटाने व्दितीय क्रमांक पटकावला. या गटात गिरीजा प्रसाद रानडे, यशस्वी सचिन तायडे, रोहिणी गणेश रौंदळे, शाल्मली विवेक देशपांडे, देवश्री दत्तात्रय कराळे, ईशा आशिष बक्षी, अन्वया निलेश पाकदुने, कुशल विवेक चापके, अंश उज्वल नवरखेडे, अद्वैत प्रविण गायकवाड, सर्वेश दीपक डामरे हे विद्यार्थी सहभागी होते. तसेच बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या वर्ग ५ ते ७ ‘ब ‘ या गटाने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. या गटात रेवती रमण घोगरे, शुभदा विवेक बिडवई, सौम्या श्याम महाजन, अदिती अजय महाजन, गिरीजा उमेश सपकाळ, पूर्वा सतीश भातखडे, पियूषा राजेश भोंडे, कल्याणी राम पांडे, शरण्या संग्राम खानझोडे, वेदश्री योगेश गोतमारे, श्रीविद्या स्वप्निल करंडे हे विद्यार्थी सहभागी होते. दोन्ही गटातील विद्यार्थ्यांना संगीत शिक्षिका सौ.सरोज जोशी व श्री.प्रशांत कोरान्ने सर यांनी मार्गदर्शन केले. तबल्यावर साईराम साखरकर यांने साथ दिली.
दोन्ही गटातील यशस्वी चमूचे संस्थेचे अध्यक्ष श्री.अविनाश देव,सचिव श्री.मोहन गद्रे,कार्यकारिणी सदस्य सौ.अनघाताई देव,शाळा समिती सदस्य, बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्ती चोपडे, बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.संगिता जळमकर, सर्व शिक्षिका,कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले.