गणपती कार्यशाळा संपन्न ……..

विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील असण्याऱ्या स्थानिक बाल शिवाजी शाळेत पर्यावरणपूरक शाडू माती पासून गणेश मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती . ‘निसर्ग कट्टा ‘ चे सदस्य मा . श्री . संदीप वाघाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा घेण्यात आली . या कार्यशाळेत वर्ग ६ ते ९ चे विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले होते. सर्वप्रथम मा . श्री . संदीप वाघाडकर यांनी ‘पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करून पर्यावरण संवर्धनास हातभार लावावा’ . हा संदेश दिला व गणेश मूर्ती तयार करण्यास शिकविले . विद्यार्थ्यांनी सुबक व सुंदर गणेश मूर्ती तयार करण्याचे कौशल्य आत्मसात केले .

सर्व विद्यार्थ्यांनी सुबक गणेश मूर्ती तयार केल्या .तसेच गणपती सजावटी करिता पर्यावरणपूरक वस्तूचा वापर करावा हे त्यांनी सांगितले. अलंकार करण्यासाठी झाडाच्या बिया, पिंपळाची पाने,लोकर यांचा उपयोग करून गणेश मूर्तीची सजावट कशी करावी याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी तयार केलेल्या मातीच्या मूर्ती स्थापन करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला .

बाल शिवाजी शाळेच्या मुख्याधापिका सौ .शोभा अग्रवाल , सौ. कीर्ती चोपडे , सौ. भारती कुलकर्णी, सौ. संगीता जळमकर तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते .
कार्यशाळा घेणारे मा .श्री . संदीप वाघाडकर यांनी तयार केलेली गणेश मूर्ती शाळेच्या मुख्याधापिकांना भेट दिली .