खंडेलवाल शाळेत आंतरशालेय “मनाचे श्लोक” पाठांतर स्पर्धेत माझी बाल शाळेचे यश….
खंडेलवाल शाळेत दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी आंतरशालेय “मनाचे श्लोक” पाठांतर स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत ब्राह्मण सभा अंतर्गत माझी बाल शाळेतील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.
केजी–टू गटातून लावण्या नेमाडे हिने उत्कृष्ट सादरीकरण करत प्रथम क्रमांक पटकावला. फुलवाडी गटातून कविशा इंगळे हिने प्रभावी सादरीकरण केले, तर फुलवाडी गटातील आरुष खेडकर याने द्वितीय क्रमांक मिळवला. तसेच रमा देशपांडे हिला उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले.
या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शक शिक्षिका सौ. कल्याणी किरण सुदामे यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. अविनाश देव, सचिव श्री. मोहन गद्रे, कार्यकारिणी सदस्य सौ. अनघाताई देव, बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कीर्ती चोपडे तसेच सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी भरभरून कौतुक केले.
